• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, August 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

प्रेमः माणसा माणसा कधी होशील माणूस?

Our Media by Our Media
February 14, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
105 1
0
प्रेमः माणसा माणसा कधी होशील माणूस?
22
SHARES
758
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.14 (डॉ.मिलिंद दुसाने)– प्रेम ही खरेतर निसर्गदत्त भावना. सर्व प्राणिमात्रांच्या ठायी ती असतेच असते. मात्र प्रेमाचे विकृत हिंसक रुप हे माणसाखेरीज कोणत्याही प्राण्यात वा पक्ष्यात दिसून येत नाही. या उद्दात्त प्रेम भावनेचा अंगिकार करुन माणुस कधी माणुस होणार? हा कवयित्री बहिणाबाईंनी विचारलेला प्रश्न यानिमित्ताने पुन्हा उपस्थित होतो.

एकंदर निसर्गाचे अवलोकन केल्यास माणसांपेक्षा पक्षी हे निश्चितच उत्कट आणि नैसर्गिक प्रेम करतात, समर्पण शिकावं तर ते पक्ष्यांकडूनच; हे ठळकपणे अधोरेखित होते.अकोल्याचे पक्षी अभ्यासक रवी धोंगळे यांनी याबाबत आपली काही निरीक्षणं नोंदवलीत. ती जागतिक प्रेम दिनानिमित्त साऱ्यांच्या अवलोकनासाठी…

हेही वाचा

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

सुगरण पक्षांचा अत्यंत कलाकुसरीने विणलेला खोपा माळरानात दिसून येतो. प्रत्यक्षात हा खोपा नर पक्षी बांधत असतो. विशेष म्हणजे आपल्या मादीला खूष करण्यासाठी तो जिवापाड ही मेहनत घेत असतो. कुशल कलाकुसरयुक्त आणि सुरक्षित खोपा असेल तरच मादी त्याच्या प्रेमप्रस्तावाला होकार देते. जर तिला तो खोपा आवडला नाही तर ती त्याला नकार देऊन निघून जाते. थोडक्यात असे, अर्धवट वा रिकामे खोपे हे अशा उध्वस्थ प्रेमाची निशाणी असते. उध्वस्थ प्रेमाचे प्रतिक असले तरीही ते देखणे असते हे विशेष. प्रेम नाकारलं म्हणून माणसांसारखे ते घर-कुटुंब उध्वस्थ करत नाहीत, की तिने नकार दिला म्हणून तिच्यावर हल्ला ही करत नाही. हे सगळं माणसांत. म्हणूनच प्रेम नकारातून हिंसेच्या घटना मानवी समाजात घडतात, पक्षांमध्ये नाही.

जे नवखे सुगरण नर असतात, ते आपल्या सिनियर नराचे घरटे बांधकाम बघून, निरीक्षण करुन आपला पहिला प्रयत्न सुरु करतात. त्यातले अनेक अपयशी ठरतात. ती घरटी अर्धवट सोडतात. पुढच्या हंगामात पुन्हा नेटाने प्रयत्न करतात, आणि आपलं घरटं साकारुन आपल्या प्रियतमेला रिझवतात. सुगरण पक्षाला ज्या पद्धतीचे घरटे विणायचे असते त्यासाठी आवश्यक लवचिक गवत जुलै महिन्यानंतर उपलब्ध होते, त्यावेळी ते घरटे बांधावयास सुरुवात करतात आणि सुमारे महिनाभरात बांधून पूर्ण करतात. हे काम पूर्ण होता होता मादीचा होकार आला तर ती ही त्याला प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देत असते. तिला तो खोपा पसंद आला तर मग हक्काने जाऊन आतली अंडी घालण्याची व उबविण्याची जागा स्वतःला हवी तशी नीटनेटकी करुन घेते. थोडक्यात इंटेरियर तिच्या चॉईसचं असतं.

तिच गोष्ट धनेश पक्षाची. झाडांच्या खोल ढोलीची निवड करुन त्यात ह्या पक्षाची मादी अंडी देते. त्यांना सुरक्षा म्हणून हा नर ढोलीचे तोंड चिखलाच्या कवचाने बुजवतो. केवळ चोच आत जाईल इतकी जागा मोकळी ठेवतो. पिले पूर्ण सक्षम होऊन उडण्यालायक होत नाहीत तोवर मादी व पिलांना एकटा अन्न पुरवतो. त्याची ही धावपळ सुरुच असते. पिलं मोठी झाल्यावर हे कवच फोडून त्यांना बाहेर आणतो. गायबगळ्याचाही नरपक्षी आपली मादी व पिलांना अशाच पद्धतीने एकटा अन्न भरवतो.

एरवी आपल्याला राघु मैना ही पक्षांची जोडी माहिती असतेच. मोरांनाही आपल्या मादीला रिझवण्यासाठी पिसारा फुलवून तिची संमती घ्यावी लागते. कोकिळेचा गोड आवाज असे आपण म्हणत असलो तरी तो नर कोकिळ पक्षाचा आवाज असतो. सगळ्यात विशेष असते ती सारस पक्षाची प्रेम कहाणी. एकदा आपला जोडीदार निवडल्यानंतर ते जोडीदार कधीच बदलत नाही. एकाचा मृत्यू झाला तर जोडीदार पुढचं आयुष्य एकट्यानेच जगतो… मरेपर्यंत!

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आणि आमचं सेम असतं’, असे मंगेश पाडगावकरांनी म्हटलं आहे खरं, पण ते त्यांनी माणसांच्या प्रेमाबाबत म्हटलं असावं. मात्र, प्रेम म्हटलं तर माणसांचं आणि पक्षांचं मात्र सेम नसतं, असंच म्हणावं लागेल.

Tags: Akolaloveman
Previous Post

शिक्षणापासून वंचित राहिलेल्या पारधी मुलांच्या शिक्षणाच्या मदतीसाठी आवाहन

Next Post

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यकम : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करा – अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

RelatedPosts

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड
Featured

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

August 1, 2025
गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
Featured

गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

August 1, 2025
अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
Featured

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2025
अकोला
Featured

जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी, मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

July 31, 2025
शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र
Featured

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

July 30, 2025
जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू
Featured

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

July 28, 2025
Next Post
National Tobacco Control Program

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यकम : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करा - अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

Hivarkhed Akot

हिवरखेड अकोटच्या रेल्वे प्रवाशांवर अन्याय! अकोट पासून रेल्वे फेऱ्या सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा आरोप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

July 30, 2025
अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

August 1, 2025
अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2025
गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

August 1, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.