अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा या गावाच्या बाजूला असलेल्या पारधी समाजाच्या मुलासाठी दोन संघर्षमय युवाक संघर्ष करीत आहेत. शासन प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेले नाही. तीन किलोमीटर दूर असलेल्या शाळेत हे लाहान मुलं जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी हे मंगेश पवार, साहेबराव राठोड या दोन तरुण युवकांनी त्या मुलांसाठी मोफत शाळा सुरू केली आहे. अनेक अडचणीला ,संघर्षाला समोर जाऊन ते मुलं या पारधी समाजातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी कसोशीने प्रयत्न करून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा या शाळेसाठी अनेक गोष्टीची आवश्यकता आहे. त्यातील काही गोष्टींची तरतूद मानवता सेवा संस्था तानखेड मुक्ताईनगर, भुसावळ मित्रपरिवाराने केली. असून त्यांना आवश्यक असलेली एक ताडपत्री व एक प्रिंटर शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी 2022 ला या शाळेसाठी मदत म्हणून या कार्यकर्त्यांना हा वस्तू सप्रेम भेट दिलेले आहे.
आपणही आपल्या आधाराचा हात या शिक्षणापासून वंचित राहालेला मुलांसाठी देणगीच्या, वस्तूच्या स्वरूपात या मुलांना देऊ शकता. काही गरज असलेल्या वस्तूची, देणगीचे त्यांना सहकार्य करावे. आपलाही खारीचा वाटा या पारधी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी द्यावे. अशी विनंती अजय बत्तूलवार, मंगेश ढेंगे, अनंता खेडकर, गजानन हरणे, दिवाकर ढोरे, मयुर देशमुख, रिजवान कुरेशी आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. तरी खालील दिलेल्या संस्थेचे अकाउंटमध्ये किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटून जागरूक नागरिक दानशूर लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Zep Samaj Vikas Sanstha.
wadala beda, tal. barshitakli dist. akola.
Central Bank Of India
-Account No :- 3875398311
-IFSCcode,CBINO281525
Branch:- Pinjar