चोहोटा बाजार (पूर्णाजी खोडके):- चोहोट्टा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अकोट ग्रामीण भाजपचे वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच समर्पन निधी संकल्पना बाबतीत माहिती देण्यात आली. व पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या फोटो ला हारार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली .
सदर कार्यक्रमाला अकोट भारतीय जनता पक्षाचे जिल्हा बुथ प्रमुख राजेश नागमते, अशोकराव गांवडे, मधुकर पाटकर, संतोष शिवरकार, गोपाल रावणकार, दत्ता गांवडे, राजेंद्र दौड, दिलीप अवधूत, हरिश्चंद्र पाखरे, जगन्नाथ राठोड, मनोहर चाकोते, मनिष मोडक, श्रीकांत गाडेकर, सुभाष मुकुंदे, नारायण साबळे,संतिष धुमाळे,नयन बुंदे, रामेश्वर पाथरे, अशोक झामरे, अनिल इंगळे, प्रदिप फुरसुले, शिवाजी सपकाळ, पुरुषोत्तम सिरसाठ, गजानन पटांगे, पंढरीनाथ वाघमारे, पुरुषोत्तम धुमाळे, गणेश पाकधुने पूर्णाजी खोडके सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.