अकोला : – ज्या बंदी व्यक्तींना मोफत विधी सेवा सहाय्य . सल्ला देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत पॅनल विधीज्ञ नियुक्त करण्यात येत . अशा पॅनल विधीज्ञांना कोणत्याही प्रकारची फीस, खर्च देण्याची आवश्यकता नाही. तसेच ज्या बंदी व्यक्तींनी त्यांच्या प्रकरणामध्ये पॅनल विधीज्ञ म्हणून नियुक्त केले आहे अशा प्रकरणामध्ये झेरॉक्स, टंकलेखन व इतर सर्व खर्च शासना मार्फत नियमाप्रमाणे देण्यात येतो . तरी प्रत्येक बंदी व्यक्ती मोफत विधीसेवा सहाय्य मिळण्यासाठी पात्र आहे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव स्वरूप बोस यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह अकोला यांच्या सयुक्त विद्यामानाने कायदे विषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन सकाळी ११ वाजता जिल्हा कारागृहात करण्यात आले होते . या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव स्वरूप बोस बोलत होते. यावेळी जिल्हा कारागृह अधिक्षक, अधिकारी, कर्मचारी, पॅनल विधीज्ञ यांची उपस्थीती होती. सचिव स्वरूप बोस म्हणाले की सर्व खर्च नियमाप्रमाणे शासनामार्फत देण्यात येत असल्याने बंदी व्यक्ती अथवा त्याच्या कुंटुबातील कोणत्याही संबंधीत व्यक्तीने विधीज्ञ यांना फिस अथवा खर्च देऊ नये, असे सांगुन बंदी व त्याच्या नातेवाहीकांना कुठलीही विधी सेवा सहाय्य , सेवा पाहीजे असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे संपर्क साधावा असे अव्हान ही त्यांनी केले. या कार्यक्रमाला एकून ४५० न्यायालयीन बदी व जिल्हा कारागृह तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकराणचे कर्मचारी उपस्थीत होते,