अकोला, दि.11: मुर्तिजापूर येथील पंचायत समितीने सन 2021-22 करीता वाढीव उपकरातून 90 टक्के अनुदानावर सर्वसाधारण शेतकऱ्यांना प्लास्टीक ताडपत्री वाटपकरीता मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांनी लेखी अर्ज गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुर्तिजापूर यांचे नावे रविवार दि. 20 फेब्रुवारीपर्यंत करावयाचे आहे.
लेखी अर्जासोबत सातबारा, आधार कार्ड, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक राहिल. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येत अर्ज करावे, असे आवाहन मुर्तिजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी केले आहे.