तेल्हारा: काल तेल्हारा शहरातील कितेक प्रभागात कोणतीही पूर्व सूचना न देता न. प. प्रशासन ने जुनी सुरळीत असलेली पानी पुरवठा जोडणी बंद करून पाणी पुरवठा बंद केले. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचे हाल झाले. उलट न. प. प्रशासन ने नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना अंतर्गत प्रभागात सिमेंट चे रस्ते खोदून नवीन पाईप लाईन टाकली आहे. त्या पाईप लाईन चे खोद कामामुळे जे रस्ते खोदले त्याची अद्यापपर्यत दुरुस्ती केली नाही तसेच कितेक प्रभागात जनतेला पाईप कनेक्टर दिले, नसून पानी पुरवठा जोडणी सुरू केलेली नसताना सरळ नवीन पाईप मधून पाणी पुरवठा सुरू करण्यात आले.
त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर सांडून पाण्याचा अपव्यय झाला. असल्याचे दिसून आले. त्यामुळे ॲड.पवन शर्मा शहर अध्यक्ष काँगेस व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभागातील जनता हे नगर पालिकेत सदर पाण्याच्या अपव्यय बाबत व नागरिकांना पानी जोडणीसाठी वयक्तिक कामगार लावून जोडणीसाठी अवाढवी पैसे लावण्यात येत आहे. ये विचाराने करिता नगर पालिकेत गेले असता तेथे प्रशासक, मुख्याधिकारी, गैरहजर होते. त्यामुळे न. प. प्रशासन कुंभकरणी झोपेत असल्याचे चित्र दिसून आले.
तेथे बनकर मनून कार्य करणाऱ्या अधिकारी यांनी उडवा उडवी चे उतर दिले सदर घटनेमुळे बरेच प्रभागात तीव्र नाराजी पसरली असून लवकरच सदर बाबीचा योग्य नियोजन न झाल्यास तेल्हारा शहरातील जनतेसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडण्यार असल्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड पवन शर्मा यांनी दिला.यावेळी अनंता सोनमाळे, अन्सार पटेल, अशूतोष बलोदे, श्याम बघन, पुरुषोत्तंम मानकर, सोनू मलीये, अबू कुरेशी, उमेश पांडे, श्याम फाफट इत्यादी उपस्थित होते.