रिधोरा(पंकज इंगळे): बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील नागरिकांना घाणीच्या विळख्यात अडकल्याने सतत साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हातपंपाचे सांडपाणी, नालीचे घाण पाणी, पावसाचे पाणी यामुळे साठलेल्या पाण्याअभावी परिसरात दुर्गंधी पसरून रिधोरा येथील संपूर्ण नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याबाबत ग्रामसेवक व सरपंच यांना वेळोवेळी तोंडी तक्रारी सांगून देखील ते जाणीवपूर्वक या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
रिधोरा येथील सरपंच गावातील या दोन वार्ड लक्ष्य देत नसल्याने तसेच ग्रामसेवक गावात ग्रामपंचायत मध्ये येत नसल्याने संबंधित समस्या मांडायचा कोणाकडे जावे असा गावातील संपूर्ण येथील नागरिकांना पडला आहे. सार्वजनिक हातपंपाचे सांडपाणी, नळाचे पाणी, नाल्याचे घाण पाणी, हे सर्व एकत्रित येऊन सार्वजनिक पाणी पिण्याच्या टाकीजवल घाणीच्या साम्राज्याचे जाळे या ठिकाणी निर्माण झाले आहे. हे सर्व साचलेले घाण पाणी येथे राहणारे कुसुम बाई जामणिक व इतर नागरिकांच्या घरांत शिरत असल्याने लहानांपासून तर मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सतत साथीच्या रोगांना आमंत्रण देत आहे. या सर्व गोष्टींची हकीकत या गावचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या कानावर वेळोवेळी घातले असता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथे राहणार्या नागरिकांनी गटविकास अधिकारी बाळापूर यांच्याकडे ई-मेल द्वारे निवेदन केले आहे. या निवेदनावर यांसह अनेकजणांच्या स्वाक्षर्या आहेत. या समस्यांचा लवकरच बंदोबस्त करावा, अन्यता पंचायत समिती बाळापूर कार्यालयासमोर मुलाबाळांसह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.