पातूर (सुनिल गाडगे) दि. ३/२/२०२२ रोजी कोठारी खुर्द, ता:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा संपन्न शेतीशाळा प्रशिक्षक :- श्री जयंत सुरवाडे यांनी कामगंध सापळे व पक्षी थांबे लावणे, 12 प्रकारच्या पाल्यापासुन वनस्पतीजन्य कीटकनाशक जसे दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, कीटकनाशक फवारणी करतांना सेफ्टी किट चा वापर करणे व काळजी घेणे, मित्रकीड व शत्रूकीड ची ओळख यावर मार्गदर्शन केले.
तसेच शेतीशाळा समन्वक मा. श्री. दिलीप बोबडे साहेब यांनी पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी पिकाचे सर्वेक्षण करून किडीचे व रोगाचे नियोजन करणे, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन तसेच उत्पादनखर्च व उत्पन्न यातील फरक, शून्य मशागत शेती, रासायनिक औषधी चा वापर कमी करणे, जैविक शेतीवर जास्त भर देणे याबद्दल मार्गदर्शन केले. शेतीशाळेला श्री. सरकटे साहेब(कृषीसहाय्क ), अमोल राठोड( समूह सहाय्यक) रोशनी कावळे (कृषिताई ), गेस्ट फार्मर श्री. किरण कावळे, हरीश टप्पे, रवींद्र काटेकर, अशोक कुकडकर, विजय टप्पे, भाऊराव ठाकरे, गणेश टप्पे, सुरेश कुकडकर, श्री सोयस्कर, तसेच गेस्ट फार्मर व गावातील शेतकरी उपस्थित होते.