तेल्हारा: नकली नोटा चलनात आणून लोकांना फसवणाऱ्या चार आरोपींविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असून पुढील तपास तेल्हारा पोलिस करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक २ फेब्रुवारी रोजी तेल्हारा पोलीस तेल्हारा आरसुड या मार्गावर गस्त करीत असताना तालुक्यातील शेख मुराद शेख अजीस रा नर्सिपुर हे आपल्या घरी जात असताना आरोपींनी नकली ५०० रुपयांच्या दोन नोटांची चिल्लर शेख मुराद यांना मागितली चिल्लर दिल्यानंतर काही वेळाने शेख मुराद यांच्या लक्षात आले की सदर नोटा ह्या नकली आहेत. त्यावरून तेल्हारा पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पीएसआय गणेश कायंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठून तिथे विचारपूस केली. असता आरोपींची झाडाझडती घेतली. त्यांच्याकडून भारतीय चलनातील नगद ५०० च्या १०० नोटा असे ५० हजार तसेच लहान मुलाच्या खेळणातील नकली ५०० च्या १२०० नोटा असे 3 बंडल एक स्कॉर्पिओ एम एच ४३ एएल ७७६ किंमत १० लाख, क्रेटा एम एच ०३ सीएस २७४३ चारचाकी किंमत १२ लाख असा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळा वरून जप्त केला.
यावेळी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला. यामध्ये आरोपी अमित आत्माराम कटारे (२७), अमोल गोविंदा कटारे(२२) रा चिस्ताळा ता मानोरा वाशीम, विजय ठाकूर (४०)रा खामगाव, वैभव चंदू दयाळ (२२) रा हिवरदरी ता महागाव जि यवतमाळ यांच्याविरुद्ध कलम ४८९ ब, ४८९ ई, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून विजय ठाकूर हा आरोपी फरार आहे.सदरची कारवाई ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश कायंदे पो कॉ सरदारसिंग डाबेराव, अमोल नंदाने, योगेश उमक,संदीप तांदुळकर, हरीश शुक्ला यांनी केली. आज आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पीएसआय गणेश कायंदे हे करीत आहे.