• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

धागा धागा अखंड विणू या…! ‘कापूस ते कापड’ प्रक्रियेचे चक्र गतिमानःमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; जिल्ह्यात २७ लघु उद्योग एकक कार्यान्वित

Our Media by Our Media
February 2, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
100 1
0
धागा धागा अखंड विणू या…! ‘कापूस ते कापड’ प्रक्रियेचे चक्र गतिमानःमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; जिल्ह्यात २७ लघु उद्योग एकक कार्यान्वित
15
SHARES
722
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – एकाच व्यवसायाशी निगडीत उद्योग करणाऱ्या लहान लहान उद्योग एककांना एकत्र आणून ‘कापूस ते कापड’ (Fiber to Fashion) या प्रक्रियेचे चक्र जिल्ह्यात गतिमान झाले आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या २७ उद्योग एककांचे एकत्रिकरण (Cluster) ‘दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला’ या नावाने तयार करण्यात आले असून त्यांचे प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाले आहे. नुकतेच बंगलोर येथील एजन्सी मार्फत ‘मॅक्स’ या इंटरनॅशनल ब्रॅंडचे दोन लाख टी शर्टस बनविण्याची ऑर्डर या उद्योगास मिळाली आहे. उद्योगाचे धागे अखंड विणत, आर्थिक समृद्धीची वस्त्र- प्रावरणे दृष्टीपथात आहेत.

कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या अकोला जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया उद्योग होऊन ‘कापूस ते कापड’ येथेच तयार व्हावे, अशी ही संकल्पना. या संकल्पनेला जिल्ह्यात ‘एक गाव एक उत्पादन’, हे रुप देऊन पालकमंत्री बच्चू कडू यांनी चालना दिली. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्रामार्फत  कापूस प्रक्रिया करणाऱ्या एककांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे ‘दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला’ या उद्योग समुहाचे एकत्रिकरण करण्यात आले. आता सद्यस्थितीत शेलापूर व बोरगाव मंजू येथील युनिट्स मिळून २७ युनिट कार्यरत आहेत. सुक्ष्म व लघु उद्योग एकक विकास कार्यक्रमात  हे क्लस्टर विकसित करण्यात आले. प्रत्येकी ५० लक्ष रुपये भांडवलातून ही युनिट्स उभी राहिली आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

२७ जणांचा सहभाग

या उपक्रमाची सुरुवात सम्यक जिनिंग चिखलगाव येथून झाली. या उद्योगाचे चालक कश्यप जगताप यांनी माहिती दिली, की, कापसाचे केवळ जिनिंग प्रेसिंग न करता पुढे धागे व कापड ते थेट वस्त्र तयार करे पर्यंत  प्रक्रिया येथेच कराव्यात. यासाठी विविध उद्योजकांना एकत्र केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी त्यास चालना देऊन एकूण ३० जणांना  एकत्र आणून त्यांना टेक्सटाईल उद्योगाचे प्रशिक्षण तसेच उद्योगांना भेटी आयोजित केल्या. त्यातून २७ जणांनी यात सहभाग घेतला. हे सर्व उद्योजक हे अनुसूचित जातीतील आहेत, हे विशेष.

साडे १३ कोटी रुपयांचे भांडवल व १० कोटींची अत्याधुनिक यंत्रसामुग्री

प्रत्येक उद्योजकास ५० लक्ष रुपये भांडवल; असे साडे तेरा कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा  उद्योग केंद्राच्या शिफारशीनुसार, युनियन बॅंकेने दिले आहे. या शिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत १० कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक यंत्रे या युनिटला अनुदानावर मंजूर झाले आहेत. तसेच साडेपाच कोटी रुपये निधी हा या परिसरातल्या रस्ते पाणी आणि विज या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी प्रस्तावित आहेत. मधल्या कोरोना काळातही मोठ्या जिकरीने ह्या उद्योजकांनी आपला उद्योग उभारण्याचे काम  सुरु ठेवले होते.दरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली होती. त्यांच्या निर्देशानुसार, या कामाला आणखी गती आली.

कापूस ते कापड

या उद्योगात कापसाच्या गाठी बनविणे, त्याचे धागे, धागे आवश्यकतेनुसार रंगविणे, धाग्याचे कापड बनविणे  आणि कापडाचे परिधाने बनविणे अशा सर्व प्रक्रिया केल्या जातात.  साधारण दिवसाला अडीच टन कापसाची प्रक्रिया या ठिकाणी होते. कापसाची एक गाठ ही  १६५ किलोची असते. एकूण उत्पादन १० हजार परिधानांचे होते. त्यात शेलापुर येथे धाग्याचे कापड बनविणे, रंगविणे याप्रकारची युनिट्स आहेत. तर बोरगाव मंजू येथे कापसापासून धागे बनविणे व कापडापासून परिधाने बनविणे ही कामे होतात. येथे बसविण्यात आलेली सर्व यंत्रे ही अत्याधुनिक आहेत.६०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून  सद्यस्थितीत प्रकल्पाच्या सुरुवातीच्या अवस्थेत ११० कर्मचारी/ कामगार काम करतात. या उद्योगात कुशल महिला कामगारांची आवश्यकता असते त्या सर्व बोरगाव व जवळच्या गावांमधील आहेत. सध्या चार महिन्यापासून उत्पादन सुरु झाले आहे.

साधारण एक किलो उच्च दर्जाच्या कापसापासून ८०० ग्रॅम धागे तयार होणे अपेक्षित असते तर कापड ७०० ग्रॅम, सामान्यतः ७०० ग्रॅम वजनाच्या कापडापासून तीन मध्यम आकाराचे टी शर्ट तयार होऊ शकतात, असे कश्यप जगताप यांनी सांगितले. नुकतेच त्यांना बंगलोर येथील एजन्सी मार्फत दोन लाख टी शर्ट मॅक्स या इंटरनॅशनल ब्रॅंडसाठी तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. आतापर्यंत त्यांनी आपला उत्पादीत माल जसे टी शर्ट, लोअर, लेगिन्स तसेच अन्य होजिअरी उत्पादने ही स्थानिक अकोला, अमरावती येथील व्यापाऱ्यांना विकली आहेत.

Tags: AccelerateCotton to TextilesEmploymentGenerationindustriesProgram
Previous Post

दर्जेदार धावपट्टी साठी विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन,तालुका क्रीडा संकुलची झाली दुरावस्था

Next Post

Corona Test : कोरोना चाचणीसाठी तरूणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब, आरोपीला १० वर्षाची शिक्षा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
corona-test-lab

Corona Test : कोरोना चाचणीसाठी तरूणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब, आरोपीला १० वर्षाची शिक्षा

suicide death

मनमाड : ट्रेकिंग करताना खोल दरीत कोसळले, दोघाही ट्रेकरचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.