तेल्हारा- तालुका क्रीडा संकुल ची दुरावस्था दूर करून ४००मिटरची धावपट्टी प्राधान्याने दर्जेदार करण्याबाबत विद्यार्थी ,युवक व क्रीडाप्रेमीनी २ फेब्रुवारीला तेल्हारा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्या रेटून धरून तहसिलदारांना निवेदन दिले या वेळी दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल चे काम अनेक वर्षा पासून कासव गतीने सुरु असून धावपट्टी ऊखळली व तेथे धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे युवकांना व विद्यार्थ्यांना या धूळीचा मोठा त्रास होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे .येथे आवश्यक सुविधा नसल्यामुळे क्रीडा क्षेत्रात तरुणांना फारसा वाव मिळू शकला नाही तसेच , पोलीस भरती , सैनिक भरती मध्ये शाररीक चाचणी सराव करण्याकरिता तालुका क्रीडा संकुल मध्ये आवश्यक असलेल्या सुविधा मध्ये लांब उडी साठी अनेक दिवसांन पासून केवळ खड्डा खोदून ठेवण्यात आला. तसेच क्रीडा संकुल मधील धाव पट्टी ची सुद्धा अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे युवक व युवतींना नाईलाजास्तव शहरातील रस्त्या वरून धावावे लागते धावपट्टी पूर्णपणे उखडल्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तरी क्रीडा संकुल मधील धाव पट्टी ४०० मिटरची प्राधान्याने दर्जेदार करून तरुणांना धावण्या करिता विना विलंब उपलब्ध करून द्यावी तसेच इतर सर्व सोयी युक्त क्रीडा मैदान उपलब्ध करून द्यावे तसेच क्रीडा संकुलवर आवार भिंत लवकरात लवकर बांधण्यात यावे तसेच सध्या स्थिती मध्ये जी धावपट्टी आहे ती दर्जेदार करण्यात यावी या प्रमुख मांगनीन साठी २ फेब्रुवारीला तहसील कार्यालय तेल्हारा येथे विद्यार्थी विद्यार्थिनी व क्रीडा प्रेमींनी धरणे आंदोलन करून तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले यावेळी जवळपास दोनशे विद्यार्थी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
तहसीलदारांनी तात्काळ घेतली दखल.
ना. तहसीलदार राजेश गुरव यांनी तहसीलदार , तालुका क्रीडा अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सर्व विद्यार्थ्यांच्या समक्ष भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून क्रीडा संकुल चा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात बोलणी केली व संबंधित अधिकाऱ्यांनी एक दोन दिवसाच्या आत क्रीडा संकुल ची प्रत्यक्ष पाहणी करून धावपट्टीचा हा प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा..
तालुका क्रीडा संकुल वरील उखडलेल्या धावपट्टी मुळे होत असलेल्या नुकसानीबाबत संबंधित प्रशासन व अधिकारी वेळकाढू धोरण राबवित आहे वारंवार मागणी करून सुद्धा दर्जेदार धावपट्टी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत त्यामुळे पुढील विविध भरती संदर्भात आमच्या भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे आठ दिवसाच्या आत दर्जेदार धावपट्टी न झाल्यास तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांनी तहसीलवर झालेल्या धरणे आंदोलना दरम्यान दिला .