अकोला, दि.1 : अकोला जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांची निवड करायची आहे. अशासकीय पात्र उमेदवारांनी सोमवार दि. 7 फेबुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करा, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन यांनी केले.
गोशाळा किंवा पांजर पोळ संस्थापैकी एका संस्थेचा अध्यक्षाचे एक पद, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थाचे सदस्यांचे दोन पद, मानव हीत किंवा कल्याणासाठी कार्य करणारे सदस्यांचे पाच ते सहा अशासकीय पदाच्या निवडीकरीता पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असेही पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.