• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 18, 2022
36 °c
Akola
36 ° Sat
36 ° Sun
36 ° Mon
35 ° Tue
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्याच्या मातीत रुजले ‘सफरचंद’, देऊळगावच्या जिगरबाज शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग; जैविक पद्धतीने संगोपन

City Reporter by City Reporter
January 25, 2022
in अकोला, शेती
Reading Time: 1 min read
0
अकोल्याच्या मातीत रुजले ‘सफरचंद’, देऊळगावच्या जिगरबाज शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग; जैविक पद्धतीने संगोपन
40
SHARES
2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(डॉ. मिलिंद दुसाने)- हिमाचल प्रदेश किंवा जम्मू काश्मिर सारख्या थंड हवामान असलेल्या प्रदेशातील फळ म्हणून सफरचंद (Apple) ओळखले जाते. मात्र या धारणांना फाटा देत देऊळगाव ता. पातूर येथील जिगरबाज शेतकरी संतोष नारायण वानखडे यांनी धाडसी प्रयोग करीत आपल्या शेतात चक्क सफरचंद या फळपिकाची लागवड केली आहे. आता ही रोपे एक वर्षाची झाली असून त्यांची वाढ चांगलीच जोमदार झाली आहे. विशेष म्हणजे वानखडे सफरचंदासहीत आपली उर्वरित शेती ही संपूर्ण जैविक पद्धतीने करत आहेत.

देऊळगाव येथील शेतकरी संतोष वानखडे यांनी आपल्या शेतातील २० गुंठे क्षेत्रात सफरचंदाची ५५० रोपे लावली आहेत. अकोला जिल्ह्यासारख्या उष्ण हवामान असलेल्या भागात हा तसा धाडसी प्रयोग म्हणावा लागेल.

हेही वाचा

श्रीराम पचिंद्रे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार

स्थानिक स्वराज्य संस्थामधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषीत; नोंदणी करण्याचे आवाहन

हिमाचल प्रदेशातून मागविली रोपे

सद्यस्थितीत महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, अहमदनगर येथे काही शेतकऱ्यांनी सफरचंद लागवड केली आहे. त्यांच्या संपर्कात संतोष वानखडे आहेत. त्यातूनच त्यांचा संपर्क हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादक शेतकरी पुरणसिंग बुनकर रा. दुर्गाला ता. शहापूर जि. कांगाडा यांच्याशी झाला. मोबाईल वरुन व यु ट्युबच्या माध्यमातून या शेतकऱ्याने विविध प्रयोगांची माहिती घेऊन मग आपल्या शेतात सफरचंद लावण्याचा निर्णय घेतला.

जैविक पद्धतीने संगोपन

त्याआधी गेल्या चार वर्षांपासून वानखडे यांनी शेती करतांना संपूर्ण जैविक पद्धतीने शेती करण्याचा अंगिकार केला होता. त्यामुळे सफरचंदही त्याच पद्धतीने लागवड करुन संगोपन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे सद्यस्थितीत १२ हजार रुपये शेकडा या दराने आणलेले सफरचंदाची रोपे व केलेली मेहनत वगळता त्यांना कोणताही भांडवली खर्च करावा लागलेला नाही. या पिकांसाठी लागणारे जीवामृत, घन जीवामृत, मिनरल तत्त्व, सुक्ष्म अन्नद्रव्य, शेण स्लरी इ. सगळे जिन्नस ते स्वतःच शेतात बनवतात आणि वापरतात.

एक वर्षात रोपांची वाढ जोमदार

दि.२२ जानेवारी २०२१ ला त्यांनी आपल्या शेतात ही रोपे आणून लावली. आज त्या रोपांची अवस्था अत्यंत चांगली आहे. त्यांच्या शेतात त्यांनी एचआरएम ९९, अन्ना, डोअरशेड गोल्डन या तिन जातीची रोपे लावली आहेत. ही रोपे ४८ ते ५० अंश सेल्सिअस तापमानातही जगू शकतात. त्यासाठी या जातींची निवड त्यांनी केली. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या वर्षाच्या उन्हाळ्यात ही रोपे टिकली. आता सध्या ही रोपे चांगली जोमदार वाढलेली असून ६ ते ८ फुट उंच वाढलेली आहेत. काही रोपांना फुलेही आली आहेत. तथापि, त्यांना सफरचंदाचा पहिला हंगाम हा रोपे पूर्ण वाढ झाल्यानंतर म्हणजेच तीन वर्षांनी घ्यावयाचा आहे. म्हणून त्यांनी आता रोपांची छाटणी सुरु केली आहे.

सफरचंदाची रोपे लावतांना दोन फुट खोल व एक फुट रुंद एक फुट लांब असे खड्डे केले. त्यात एक किलो शेणखत टाकले. त्यानंतर ही रोपे लावण्यात आली. या रोपांना आठवड्यात एकदा एकतास ठिबक संचाने पाणी दिले जाते. या जातींना जादा पाण्याची गरज नसते,असेही शेतकरी वानखडे सांगतात. याशिवाय हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना सफरचंद लागवडी संदर्भात जे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होत असते त्या बैठकांना ऑनलाईन पद्धतीने संतोष वानखडे सहभागी होऊन वेळोवेळी मार्गदर्शन मिळवत असतात.

कांदा व हरभऱ्याचे आंतरपिक

सद्यस्थितीत सफरचंदाच्या रोपांच्या दोन ओळीत ते आंतरपिक घेत आहेत. त्यात त्यांनी खरीप हंगामात कांदा तर रब्बी हंगामात हरभरा लागवड केली आहे.ही पिकेही ते जैविक पद्धतीनेच घेतात.

एका झाडापासून २० किलो उत्पन्न अपेक्षित

सफरचंदाचे रोप परिपक्व झाल्यावर (तीन वर्षानंतर) जानेवारी ते फेब्रुवारी या काळात त्याला फुलधारणा होते. त्यानंतर फलधारणा होऊन मे पर्यंत फळे पक्व होऊ लागतात. प्रत्यक्ष मे मध्ये फळे काढणीला सुरुवात होते. एका झाडापासून २० किलो फळांचे उत्पादन मिळू शकते,असेही वानखडे यांनी सांगितले.

वानखडे यांच्या या प्रयोगाबद्दल कृषी विभागाला माहिती मिळाल्यावर मंडल कृषी अधिकारी इंगळे, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या जैविक शेतीच्या प्रयत्नांनाही कृषी विभागामार्फत मार्गदर्शन होत असते. सद्यस्थितीत ‘आत्मा’च्या शेतकरी मार्गदर्शक गटात वानखडे यांचा समावेश करण्यात आला आहे. सफरचंदाची लागवड तर यशस्वी ठरली आहे; आता प्रतीक्षा प्रत्यक्ष उत्पादनाची आहे. आपल्या शेतातून विषमुक्त पिक निर्माण व्हावे,असेच संतोष वानखडे यांचे प्रयत्न आहेत.

Tags: apple farming akola
Previous Post

Prashant Kishor : २०२४ मध्ये भाजपचा पराभव शक्य : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर

Next Post

राष्ट्रीय मतदार दिवस मतदार जागरुक तर लोकशाही सुदृढ- जिल्हाधिकारी निमा अरोरा

RelatedPosts

shri (1)
Featured

श्रीराम पचिंद्रे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार

May 18, 2022
raise-creamy-layer-cei
Featured

स्थानिक स्वराज्य संस्थामधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषीत; नोंदणी करण्याचे आवाहन

May 18, 2022
maxresdefault
Featured

उद्यमिता यात्रा शुक्रवारी (दि.20) अकोल्यात; तीन दिवस उद्योजकता कार्यशाळा

May 18, 2022
Logo
Featured

जि.प. स्थानिक उपकर योजना शेतकऱ्यांकडून 31 मे पर्यंत अर्ज मागविले

May 17, 2022
शाळा;
Featured

पाटसूल येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा;प्रवेश प्रक्रिया सुरु

May 17, 2022
tribal-
Featured

कंत्राटी कला शिक्षक,संगणक शिक्षक पदासाठी लेखी परीक्षा दि.29 रोजी

May 17, 2022
Next Post
nima arora

राष्ट्रीय मतदार दिवस मतदार जागरुक तर लोकशाही सुदृढ- जिल्हाधिकारी निमा अरोरा

नवरदेव लग्न लागण्याआधी डिजेच्या तालावर नाचला म्हणून मौलानाचा लग्न लावण्यास नकार

शासकीय निर्बंधांमुळे ‘शुभमंगल' झाले शॉर्टकट

Stay Connected

  • 319 Followers
  • 284 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

shri (1)

श्रीराम पचिंद्रे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार

May 18, 2022
MahaDBT-Scholarship

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी निकाली काढावेत

May 16, 2022
अकोट मिटिंग

शेतीपूरक व्यवसाय, वन पर्यटनातून ‘शहानूर’ होणार उद्योगपूर्ण गाव :परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

May 17, 2022
GADAKAR MAHARAJ

पालकमंत्र्यांकडून डॉ. उद्धव गाडेकर महाराज यांच्या परिवाराचे सांत्वन

May 17, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks