अकोला, दि.20 : जिल्ह्यासाठी फेब्रुवारी महिन्यासाठी लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.
वाटप परिमाण व दर याप्रमाणे-
१. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी (गहू) तीन किलो प्रतिव्यक्ती तर धान्य वाटपाचे दर दोन रुपये प्रतिकिलो.
२. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ दोन किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रतिकिलो.
३. अंत्योदय अन्न योजना गहू- १५ किलो प्रतिकार्ड, दोन रुपये प्रतिकिलो.
४. अंत्योदय अन्न योजना तांदूळ-२० किलो प्रतिकार्ड, तीन रुपये प्रति किलो.
५. एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता गहू-चार किलो प्रतिव्यक्ती, दोन रुपये प्रतिकिलो.
६. एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता तांदूळ- एक किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रतिकिलो.
७. नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता-एक किलो प्रतिशिधापत्रिका, २० रुपये प्रतिकिलो.
८. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी गहू, तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ (मोफत)
९. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना गहू व तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ (मोफत)
हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील,असे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी कळविले आहे.
केंद्र शासनो सन २०२१-२२ या वर्षापासून पशुसंवर्धनाव्दारे उधोजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारित राष्टीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी प्रदान केलेली आहे. सदर योजने अंतर्गत शेळी- मेंढी पालन कुक्कुट पालन वराह पालन पशुखाध व वैरण विकास उपअभियांनांतर्गत मुरघास निमिती टीएमआर व फॉडर ब्लॉक निमिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता ५० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुदानाची अधिकता मर्यादा शेळी-मेंढी पालनाकरीता रू ५० लक्ष कुक्कुट पालनाकरीता रू २५ लक्ष वराह पालनाकरीता रू ३० लक्ष आणि पशुध्खाध व वैरण विकास यासाठी रू ५०लक्ष अशी आहे प्रकल्पाकरीता स्वहिस्सा व्यक्तिरीक्त उर्वरित आवश्यक निधी बॅकेकडून कर्जाव्दारे उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. सदर योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यवसायीक स्वंय सहाययता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी सहकारी संस्था कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी सहकारी दुध उत्पादक संस्था सह जोखिम गट (जेएलजी) सहकारी संस्था, खाजगी संस्था , स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेवू शकतात.