अकोला दि.18: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 772 अहवाल प्राप्त झाले. त्यात 327 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून नऊ असे एकूण 336 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 31 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 60286(45169+14691+426) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 327 व खाजगी 9) 336 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 31 = एकूण पॉझिटीव्ह 367.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 352945 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 348992 फेरतपासणीचे 404 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3549नमुने होते. आजपर्यंत एकूण 352945 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 307776 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर 336 पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 327 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 116 महिला व 211 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 205 जण हे अकोला शहरातील, अकोला ग्रामीण येथील 14, मुर्तिजापूर येथील 54, बार्शीटाकळी येथील 14, पातूर येथील आठ, बाळापूर येथील 19 व अकोट येथील 13 जण रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 336 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
198 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
1766 जणांवर उप चार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 60286(45169+14691+426) आहे. त्यात 1145 मृत झाले आहेत. तर 57375 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1766 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 563 चाचण्यात 31 पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.17) दिवसभरात झालेल्या 563 चाचण्या झाल्या त्यात 31 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात बाळापूर येथे 20, बार्शीटाकळी येथे 12, पातूर येथे सात, तेल्हारा येथे एक, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 108 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोला ग्रामीण येथे 128 चाचण्यात तीन, अकोट येथे 75 चाचण्यात 13, मुर्तिजापूर येथे चार चाचण्यात तीन, जिल्हा आरोग्य कर्मचारी 106 चाचण्यात चार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 57 चाचण्यात तीन, हेडगेवार लॅब येथे 45 चाचण्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 563 चाचण्यात 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.