अकोट (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील ग्राम रामापूर येथे शासनाने लाखो रुपये खर्च करून तलाठी निवास कार्यालय बांधले आहे.मात्र हे तलाठी निवास कार्यालय बांधले तेव्हा पासून तर आज परेनंत गेल्या 7 वर्षा पासून येथे अद्यापही तलाठी हजर राहत नाहीत.शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी हजर राहण्याचे कडक आदेश देऊन सुद्धा रामापूर येथील तलाठी रामापूर येथे मुख्यालयी हजर न राहता अकोट वरून हप्त्यातून दोन दिवस येणे जाणे करीत उंटा वरून शेळ्या हाकालत आहेत. व शासनाने दिलेल्या आदेशाची अक्षरशः पायमल्ली करीत आहेत. ही अत्यंत चुकीची व उल्लेखनीय बाब आहे.या बाबत वेळोवेळी तहसीलदार अकोट यांचेकडे तक्रारी, पेपरला, चायनल ला बातम्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
मात्र याची कुठलीही दखल घेत आजपरेनंत सुद्धा रामापूर येथील तलाठी यांचेवर कायदेशीर कारवाई करून त्यांना रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय येथे मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले नाही. आता नव्याने रुजू झालेले तलाठी बोकाडे व धांडे हे सुद्धा तलाठी निवास कार्यालय रामापूर येथे हजर राहण्यास पूर्णपणे टाळाटाळ करीत आहेत. यांनी अकोट येथे प्रायव्हेट ऑफिस केले आहे. तिथं सुद्धा हजर राहत नाहीत शेतकरी हे सातबारा किंवा ईतर महत्वाच्या कामासाठी लागणारे कागदपत्रा करीता चकरा मारतात व तलाठी बोकाडे यांना नाईलाजाने फोन करतात तेव्हा तलाठी यांचे कडून शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात येतात. व देठे नामक वयक्तीच्या सेतू मधून सातबारा काढा तेथून तुम्हाला सातबारा मिळेल असे सांगण्यात येते.
वास्तविक पाहता तलाठी बोकाडे यांचेकडे रामापूरचा तलाठी चार्ज देण्यात आलेला आहे, व तलाठी बोकाडे यांनी रामापूरला असलेले तलाठी निवास कार्यालय मध्ये हजर राहणे गरजेचे आहे.मात्र हप्त्यातून सातही दिवस रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय हे बंदच राहते, व अकोट येथे शेतकरी चकरा मारतात तर त्यांना खाली हातच वापस यावे लागते. करिता वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय येथे नव्याने रुजू झालेले रामापूरचे तलाठी बोकाडे यांना मुख्यालयी रामापूरला हजर राहण्याचे कडक आदेश द्यावे अशी मागणी रामापूर व बोर्डी येथील शेतकरी करीत आहेत.