• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मकर संक्रांत : गोडवा संक्रांतीचा

Our Media by Our Media
January 14, 2022
in Featured, उत्सव, संपादकीय
Reading Time: 1 min read
82 1
0
makar sankranti
12
SHARES
591
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतात विविध प्रांतांत विविध नावांनी वेगवेगळ्या प्रकारे मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. राजस्थान, गुजरातमध्ये हा दिवस पतंगाचा दिवस म्हणून साजरा होतो. वाद, कटू घटना मागे टाकून नात्यात पुन्हा गोडवा निर्माण करूया, असा गोड संदेश हा सण देतो.

संक्रांत म्हणजे संक्रमण करणारा म्हणजे वाढ करीत जाणारा वर्धिष्णू सण! या दिवसापासून दिवस वाढत जातो. रात्र कमी होते. वातावरणातील थंडावा कमी होऊन उष्मा वाढत जातो. सूर्याचा मकर राशीत होणार्‍या आगमनाचा पहिला दिवस म्हणजे संक्रांत होय! आशिया खंडात हा संक्रांतीचा सण बहुतांश देशांत साजरा केला जातो. नेपाळमध्ये तो ‘माधी’ या नावाने, थायलंडमध्ये ‘सोंक्रांत’, तर म्यानमारमध्ये ‘थिंगयान’ या नावाने हा सण साजरा करतात.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

भारतात विविध प्रांतांत विविध नावांनी वेगळ्या प्रकाराने हा सण साजरा केला जातो. केरळमध्ये ‘पोंगल’, पंजाबमध्ये ‘लोहरी’ अशी या सणाची नावे आहेत. राजस्थान, गुजरातमध्ये हा दिवस पतंगाचा दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी गुजरात, राजस्थानमध्ये पतंग उडवण्याच्या कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते.

या दिवसाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन कारणांमुळे महत्त्व आहे. वैज्ञानिक कारण म्हणजे, या दिवसानंतर रात्र लहान होऊ लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो. थंडीचा जोर पूर्णपणे नसला, तरी थोड्या प्रमाणात कमी होऊ लागतो. हवामान कोरडे असते. अशा वेळी तीळ आणि गूळ यांचा आहारात समावेश करणे हा आरोग्य सल्ला अतिशय गुणकारक ठरतो.

तिळाचा स्निग्धपणा आणि गुळाचा उष्णपणा याचे परिणाम तब्येतीसाठी उत्तम! तसेही आपल्याकडे ऋतुमानानुसार सणांचे, देवांचे प्रसाद असतात. म्हणूनच संक्रांतीला तिळगुळाचे लाडू, वड्या, गूळपोळ्या हा प्रमुख पदार्थ असतो. या दिवसातले वारे संक्रांतीचे वारे म्हणून प्रसिद्ध आहेत. या वार्‍यांवर अनेक मराठी कविता, भावगीते बेतलेली आहेत. हीच वार्‍याची अनुकूलता पतंग उडविण्यासाठी योग्य असते आणि म्हणूनच पतंगाचा खेळ या दिवसात खेळला जातो. नववर्षाची सुरुवात अशा आनंददायक सणाने होत असते.

‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत आपण एकमेकांना भेटतो यामागील उद्देश असा की, वर्षभरात जो काही मनमुटाव, वाद आपल्यात झाले असतील, ज्या काही कटू घटना आयुष्यात घडल्या असतील त्या मागे टाकून नात्यात पुन्हा गोडवा निर्माण करूया, असा गोड संदेश हा सण देतो.

भारतीय परंपरेवर, संस्कृतीवर नजर टाकल्यास असे लक्षात येईल की, आपल्या प्रत्येक सणांमधून एक चांगला संदेश नेहमीच असतो. प्रत्येक सणाला एक कथानक असते. त्या-त्या सणांची देवता असते. अशाच प्रकारच्या अनेक कथा, रूपके या सणाशी जोडलेली आहेत. यावर्षी 14 जानेवारी (शुक्रवार) 2022 रोजी संक्रांत आहे. याचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांत देवीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. अशा प्रकारची वर्णने सर्वत्र वाचनात येतात.

संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्यात तीळ टाकून चविष्ट भाजी बनवली जाते. या भाजीला लेकुरवाळी भाजी म्हणतात. यासोबत बाजरीची, ज्वारीची आणि मक्याची भाकरी, वालाच्या शेंगांची भाजी, मुगाची खिचडी, गुळाची पोळी असा नैवेद्य देवाला दाखवितात. या दिवशी प्रत्येक ठिकाणी तिळाचा वापर केला जातो.

स्त्रियांना या सणाचे अपार कौतुक असते. नवविवाहितांचे तर अधिक कौतुक होते. काळी साडी, हलव्याचे दागिने, हळदी-कुंकू अशा अनेक आठवणी या संक्रांतीशी जोडलेल्या असतात. लहान बाळांना काळे झबले, हलव्याचे दागिने, लूट अशा प्रकाराने आनंद साजरा केला जातो. घरोघरी हळदी-कुंकू, वाण देणे अशा कार्यक्रमांत खंड पडला आहे. मनुष्य हा उत्सवप्रिय असला, तरी तो समाजशील प्राणी आहे. आपापल्या जबाबदार्‍या सांभाळत संक्रांतीचा सण गोड व्हावा, यासाठी खूप खूप शुभेच्छा!

Tags: Makar sankrantiMakar sankranti 2022sweet sankranti
Previous Post

व्याघ्र समितीचा घेतला आढावा; समन्वय साधून वन्यप्राणी संरक्षणासाठी प्रयत्न करा

Next Post

Pune Crime : लोणीकंदमध्ये वर्चस्ववादातून टोळी युद्धाचा भडका

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Crime

Pune Crime : लोणीकंदमध्ये वर्चस्ववादातून टोळी युद्धाचा भडका

उद्धव ठाकरे

मुंबई पालिकेवर टीका करणारे किती जण काम करतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.