अकोला दि.१२ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आज करण्यात आले.
स्व. वसंत देसाई स्टेडियम येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला तालुका क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, जिल्हा युवा पुरस्कारार्थी नाजिया खान, रोहन बुंदेले व दिनकर उजळे, क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट यांच्या उपस्थितीमध्ये हार अर्पण केले. जिल्हा युवा पुरस्कारार्थी नेहरू युवा मंडळ शिलोडाचे संचालक नाजिया टी खान, रोहण बुंदेले यांनी यावेळी स्वामी विवेकानंद यांचे युवकांबद्दलचे विचार व्यक्त केले. तसेच सर्व पुरस्कारार्थी व अतिथींचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्तावना क्रीडा अधिकारी दिनकर उजळे यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मीशंकर यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतिशचंद्र भट, कनिष्ठ लिपिक महेश पवार, दिपक व्यवहारे, प्रशांत खापरकर, राजू उगवेकर, निशांत वानखडे, अजिंक्य धेवडे, गजानन चाटसे, विक्रम काळे, अनिल ढेंगाळे आदींनी परिश्रम घेतले आहे.