अकोला : शासकीय सबसिडी असलेल्या राशनच्या तांदुळाची काळा बाजरी करून विक्री केली जात असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी करून दोन आरोपीस अटक केली. या कारवाईत एकूण 19 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शासकीय सबसिडी असलेला राशनचा तांदूळ काळाबाजार करून विक्रीसाठी नेत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने बाळापूर हायवे जवळ नाकाबंदी करून एमएच 40 एके 0138 क्रमांकाचा ट्रकला अडविले. यावेळी वाहनधारकांकडे तांदूळ खरेदी करण्याची कोणतीही बिल्टी खरेदी-विक्री नसल्याने ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये राशनचा तांदूळ असल्याचे आढळून आले.
या ट्रकमध्ये प्रत्येकी 50 किलो वजनाप्रमाणे 490 पोते तांदूळ असा 24 हजार 555 किलो राशनचा तांदूळ आढळून आला. या कारवाईत चार लाख 90 हजार रुपयांचा तांदूळ पंधरा लाखाचा ट्रक असा एकूण 19 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.