नवी दिल्ली: देशात कोरोना संसर्ग झपाट्याने फैलावत आहे. देशात कोरोना महारोगराईची सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत सर्वाधिक उच्चांकी वाढ आज (दि.०७) गुरूवारी नोंदवण्यात आली आहे. दिवसभरात १ लाख १७ हजार १०० कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, ३०२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान ३० हजार ८३६ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.५७ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. (Corona Update)
यापूर्वी ६ जून २०२१ रोजी देशात १ लाख ६३६ कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली होती. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ३ कोटी ५२ लाख २६ हजार ३८६ पर्यंत पोहचली आहे. यातील ३ लाख ७१ हजार ३६३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, ४ लाख ८३ हजार १७८ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
Corona Update : देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १.०५ टक्क्यांवर
देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १.०५ टक्क्यांवर पोहचली आहे. शुक्रवारी देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर ७.७४ टक्के, तर आठवड्याचा संसर्गदर ४.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाविरोधातील लसीकरण अभियानातून आतापर्यंत १४९ कोटी ६६ लाख ८१ हजार १५६ डोस लावण्यात आले आहेत.
यातील ९४ लाख डोस गुरूवारी दिवसभरात देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या १५ ते १८ वयोगटातील लसीकरणातून आतापर्यंत १ कोटी ६८ लाख २० हजार ५६३ मुलांना पहिला डोस लावण्यात आल्या आहे.
केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १५४ कोटी ३२ लाख ६२ हजार ९५५ डोस पुरवण्यात आले आहेत. यातील १८ कोटी १४ लाख २८ हजार ३१६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
देशात कोरोना तपासण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. गुरूवारी दिवसभरात १५ लाख १३ हजार ३७७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. देशाता आतापर्यंत ६८ कोटी ६८ लाख १९ हजार १२८ तपासण्या करण्यात आल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे.
ओमायक्रॉनबाधितांची संख्या ३ हजारांवर
देशात आतापर्यंत ३ हजार ७०० ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यातील १ हजार १९९ रूग्णांनी संसर्गावर मात मिळवली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ८७६ ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यातील ३८१ रूग्णांनी संसर्गावर मात मिळवली आहे. राजधानी दिल्लीत ४६५ पैकी ५७, कर्नाटक ३३३ पैकी २६, राजस्थान २९१ पैकी १५९ तर केरळमध्ये २८४ पैकी ९३ रूग्णांनी ओमायक्रॉनला मात दिल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहेत.