तेल्हारा : तेल्हारा पत्रकार संघाचे वतीने येथील माहेश्वरी भवन मध्ये ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार दिनाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे वतीने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेल्या दर्पण नियतकालिके चे स्मरण म्हणून ६ जानेवारी पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटो पूजन करून करण्यात आला. यावेळी तालुक्यातील जेष्ठ पत्रकारांचा कार्यगौरव “दिवंगत पत्रकार, संपादक, साहित्यिक प्रभाकरराव सावरकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार “देवून करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे तर प्रमुख उपस्थितीत मध्ये ज्ञानोबा फंड (पो.नि.तेल्हारा), लिंबाजी बारगीरे (गटविकास अधिकारी), दिपक राठोड (विजवितरण), डॉ. गोपाल ढोले (प्राचार्य गो.खे.महाविद्यालय) उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील जेष्ठ पत्रकार प्रल्हादराव ठोकणे, सुरेशराव शिंगणारे, रमेशपंत गोयनका, मनोहरराव गोलाईत, दत्तात्रय बिहाडे, डॉ. संतोष ताकोते यांचा कार्यगौरव सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच पत्रकार शाम जोशी हे शासकीय सेवेत रूजू झाल्याने त्यांचा सत्कार पत्रकार संघाचे वतीने करण्यात आला.
यावेळी तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे सत्यशील प्र. सावरकर, अनंतराव अहेरकर, प्रा. कष्णा फंदाट, रामभाऊ फाटकर,धर्मेश चौधरी, प्रशांत विखे,अनिल जोशी, प्रा. विद्याधर खुमकर, अनिल अवताडे, निलेश जवकार, रवि शर्मा, बसवेश्वर मिटकरी, सुरेश सिसोदिया, अमित काकड, राहूल मिटकरी यांच्या सह तालुक्यातील गावोगावीचे वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागतगीत पळसकर यांचे गायन संचाने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कष्णा फंदाट, सुत्रसंचालन विद्याधर खुमकर, सत्कार मुर्ती परिचय धर्मेश चौधरी तर आभार अनिल अवताडे यांनी व्यक्त केले. असे परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश जवकार यांनी कळविले.