वाडेगाव(डॉ चांद शेख)- बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडेगाव ग्रामपंचायत मध्ये सुरु असलेले विकास कामे काही नागरिकांच्या नजरेत खूपत असल्याने येथील ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीचा बेत आखल्याचे बोलल्या जात आहे.लोकात मिसळुन काम करणारे ग्रामविकास अधिकारी डिवरे यांची बदली होऊ नये अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्था कडुन जोर धरत आहे.
वाडेगाव ग्रामपंचायतचे ग्राम सेक्क गजानन डिवरे यांची बदली इतर कोणत्यांही ठिकाणी न करण्याच्या बाबतीत वाडेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, गट विकास अधिकारी बाळापूर, जिल्हा परिषद अध्यक्ष अकोला यांच्याकडे रितसर वांरवार निवेदन देण्यात आली आहेत. वाडेगाव ग्रामपंचायतचे ग्राम सेवक यांचे पारदर्शक काम पाहता तसेच गावकऱ्यांशी असलेला सुसंवाद अशा चांगल्या गुणांमुळे त्यांची बदली करण्यात येऊ नये ही मागणी रेटून धरण्यात आली आहे. परंतु गावातील काही राजकारणी ग्रामविकास अधिकारी यांना खोटे कामे करण्यास सांगतात अशांना डिवरे यांनी थारा दिलेला नाही त्यामुळेच गावातील काही राजकारणी यांनी डिवरे यांच्या वारंवार तक्रारी करुन आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांवर राजकिय दबाव तंत्राचा वापर करुन डिवरे यांच्या बदलीचा कट आखला आहे. मार्च अखेर पर्यंत गावातील विकास कामे मार्गी लावणे लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळून देणे याकरिता ग्राम सेवक यांची ग्रामपंचायतला असणे गरजेचे आहे. याकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून वाडेगाव ग्रामपंचायतीचे ग्राम सेवक यांची बदली करु नये अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे.
____________
वाडेगाव ग्रामपंचायतचे ग्राम सेवक गजानन डिवरे यांचे काम उल्लेखनीय असून त्यांच्या कामाबद्दल ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोणतीही अडचण नाही.व त्यांची कोणतीही तक्रार नाही.
मेजर मंगेश तायडे
सरपंच ग्रामपंचायत वाडेगाव
____
वाडेगाव ग्रामपंचायतचे ग्राम सेवक डिवरे यांचे काम अतिशय उल्लेखनीय असून त्यांच्या कामाबद्दल गावत विकास कामे जलद गतीने होत आहे म्हणुन गावच्या विकासा साठी ग्राम सेवक डिवरे यांना काम स्वरुपी वाडेगांवात रूजु करावे.
मो . अफ्तार ऊर्फ बब्बु भाई
माजी पंचायत समीती सदस्य
ग्राम सेवक गजानन डिवरे यांचे काम चांगले असून त्यांना कायम स्वरूपी वाडेगांवात रुजु करावे. त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. म्हणून गोडगांवत विकास कामे होत आहे.
मौलाना शेख मोईन
ग्राम पंचायत सदस्य, वाडेगांव