अकोला: परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्यावतीने कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चिकटे नेहरू पार्क स्थित आपल्या पॉईंट वर कर्तव्य बजावत असतांना एक मालवाहतूक करणारा ऑटो रिक्षा रस्त्याच्या मधोमध बंद पडला असता त्या ऑटोरिक्षा ला स्वतः ढकलून नेत साईडला केले व होणारी वाहतूक कोंडी टाळली.
अश्या या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेत परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे, समाज क्रांती आघाडी चे महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडु दादा वानखडे, परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य सचिव सतिश तेलगोटे यांनी त्यांच्या ड्युटी ठिकाणी जाऊन त्यांचा सत्कार केला.