• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

मोठा निर्णय : मुंबई मनपाच्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

Our Media by Our Media
January 3, 2022
in राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
106 1
0
schools
15
SHARES
767
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: मुंबई मनपाच्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन वर्ग सुरु राहतील. दरम्यान, देशभरात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे संकेत मिळत असून, केंद्र सरकारने आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

रविवारी देशात एका दिवसात 27 हजार 553 कोरोनाबाधितांची भर पडली असून, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजारांवर गेली, तर 284 रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीसह मुंबई आणि कोलकाता शहरात कोरोना वेगाने पसरत आहे. पश्‍चिम बंगाल सरकारने सोमवारपासून
कोलकाता शहरात मर्यादित निर्बंध लागू केले. देशात ओमायक्रॉनही पसरत असून, बाधितांची संख्या 1,525 झाली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या संसर्गाचा वेग पाहता या लाटेत 80 लाख नागरिक बाधित होण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण 1 टक्‍का जरी गृहीत धरले, तरी 80 हजार मृत्यू होऊ शकतात. यात विविध आजार असलेल्या नागरिकांना तसेच ज्येष्ठांना सर्वाधिक धोका असल्याने ही लाट गांभीर्याने घ्यावी, असा इशारा राज्याचे अतिरिक्‍त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त आणि जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही अथवा ज्यांना गंभीर स्वरूपाचे इतर आजार आहेत, त्यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी हा विषाणू तेवढाच घातक आहे. त्यामुळे लसीकरणाला गती द्यावी आणि लोकांचे जीव वाचवावेत, असे या पत्रात म्हटलेले आहे.

दरम्यान, राज्यात रविवारी (दि. 2) 11 हजार 877 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 50 ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली. मुंबईत 8 हजार 063 इतक्या रुग्णांची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून वेगाने रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 42 हजारांवर पोहोचली आहे. राज्यात आजवर 67 लाख नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील 65 लाख 12 हजार नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 लाख 41 हजार 542 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. राज्याचा मृत्युदर 2.11 इतका आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 510 वर

राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 510 वर पोहोचली आहे. रविवारी 50 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. यातील तब्बल 36 रुग्ण पुणे शहरातील आहेत, तर पिंपरीचिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीणमध्ये 2, सांगली, ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 510 पैकी आजवर 193 ओमायक्रॉनबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत सर्वाधिक 328 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत. याखालोखाल पुणे मनपा क्षेत्रात 49, पिंपरी-चिंचवडमध्ये 36, तर पुणे ग्रामीण 23, ठाण्यात 13, नवी मुंबई, पनवेलमध्ये प्रत्येकी 8, कल्याण डोंबिवली 7, नागपूर आणि सातार्‍यात प्रत्येकी 6 रुग्ण आहेत.

Tags: Mumbai Municipal CorporationSchool
Previous Post

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालका विरुद्ध धडक कारवाई….. ग्रामीणचे ठाणेदार नितीन देशमुख यांची धडक कारवाई…..

Next Post

कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलीस कर्मचारी यांचा परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने सत्कार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलीस कर्मचारी यांचा परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने सत्कार

कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलीस कर्मचारी यांचा परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने सत्कार

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज  ८वे राज्यस्तरीय विचार  साहित्य संमेलनात रुग्णसेवक सुशील कांबळे यांचा सत्कार

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ८वे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनात रुग्णसेवक सुशील कांबळे यांचा सत्कार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.