• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तीन दिवसीय राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद: पशुरोगांच्या निदान व उपचारासाठी नवतंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक- डॉ.दक्षिणकर

Our Media by Our Media
December 31, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
90 1
0
तीन दिवसीय राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद
13
SHARES
649
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.३१: कोरोना सारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, पशू आणि मानव यांच्यातील सामाईक रोगाचा फैलाव लक्षात घेता, पशुंमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या विविध रोगांचे वेळीच निदान व अनुरूप औषधोपचारासाठी पशुवैद्यकांनी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन वासुदेव चंद्रकर कामधेनु विश्वविद्यालय, दुर्गचे कुलगुरु प्रा. डॉ. नारायण दक्षिणकर यांनी केले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत अकोला येथील घटक महाविद्यालय स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था यांचे वतीने दिनांक २७ ते २९ डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय आभासी राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेचे उद्घाटन डॉ. दक्षिणकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरु प्रा. डॉ. कर्नल आशिष पातूरकर यांच्या मार्गदर्शनात स्ना.प.प.संस्था अकोला येथे ‘पशुवैद्यक क्षेत्रातील वारंवार उद्भवणार्‍या रोगांचे निदान आणि औषधोपचारमधील नवनवीन पद्धती’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

याप्रसंगी संचालक शिक्षण व अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. व्ही. उपाध्ये, संचालक विस्तारशिक्षण प्रा. डॉ. ए.यू. भिकाने यांचीही उपस्थिती होती. यावेळी संशोधनपर लेखांच्या सारांशपुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आयोजन समितीचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी परिषदेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. प्रास्ताविक आयोजन सचिव डॉ. किशोर पजई यांनी केले.

तीन दिवस चाललेल्या या परिषदेत पशुऔषध उपचारशास्त्र, पशु शल्यचिकित्सा व क्ष किरण शास्त्र, पशुप्रजनन व प्रसूती शास्त्र आणि पशुरोगनिदान शास्त्र इ. विषयावर नामवंत वक्त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादरीकरणही झाले.

समारोपप्रसंगी डॉ. सुनील वाघमारे यांनी अहवाल वाचन करून परिषदेचा वृत्तांत सादर केला. या परिषदेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील सहभागी एकूण २८४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. १०२ स्नातकपूर्व पदवी विद्यार्थी आणि १०७ स्नातकोत्तर पदवी विद्यार्थी यांनी आपले पशुचिकित्सालयीन संशोधन सादर केले. आयोजक सह सचिव डॉ. महेश इंगवले यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

स्पर्धेतील विजेते विद्यार्थी याप्रमाणे-

पशुऔषध उपचारशास्त्र विषयात स्नातकपूर्व प्रवर्गात प्रथम क्र- एस.जननी; व्दितीय क्र.एस. सारथ; तृतीय क्र.पी. पवित्रा तसेच स्नातकोत्तर प्रवर्गात प्रथम क्र- के. मोहनांबल; व्दितीय क्र.ए. रागिनी; तृतीय क्र.हनील जॉन डिसूझा

पशु शल्यचिकित्सा व क्ष किरण शास्त्र: स्नातकपूर्व प्रवर्गात प्रथम क्र- कु. श्रेया पराशर; व्दितीय क्र.एस.संधिया; तृतीय क्र.कीर्ती आणि स्नातकोत्तर प्रवर्गात प्रथम क्र- आशीष क्रिस्तोफर; व्दितीय क्र. कु. सौम्या रमनकुट्टी; तृतीय क्र.कु. अंजु पुनिया

पशुप्रजनन व प्रसूती शास्त्र: स्नातकपूर्व स्नातकपूर्व प्रवर्गात प्रथम क्र- जे. थिलायस्वारी; व्दितीय क्र.व्ही.निवेदिता; तृतीय क्र.हर्षित सक्सेना तसेच स्नातकोत्तर प्रवर्गात प्रथम क्र- एम.प्रवीण कुमार; व्दितीय क्र.आर.डी. प्रजापती; तृतीय क्र.अबोली कथे आणि अशोक वालीकर

पशुरोगनिदान शास्त्र :स्नातकपूर्व प्रवर्गात प्रथम क्र- एस.सुंदरप्रेम; व्दितीय क्र.-कु. प्रतिभा गोयल; तृतीय क्र.-आर.जे. लेंडेवाड आणि स्नातकोत्तर प्रवर्गात प्रथम क्र-कु. दिव्या सभरवाल; व्दितीय क्र. पी.उरकुडे; तृतीय क्र. एम.रामटेके

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. गिरीश पंचभाई यांनी केले तर डॉ. पजई, यांनी आभार प्रदर्शन केले. परिषदेच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. चैतन्य पावशे, डॉ. मिलिंद थोरात, डॉ. रत्नाकर राऊळकर, डॉ. रंजीत इंगोले, डॉ. प्राजक्ता कुरळकर, डॉ. श्याम देशमुख, डॉ. भुपेश कामडी, डॉ. सुनील हजारे, डॉ. व्ही. बी. काळे आदींनी परिश्रम घेतले.

Tags: AkolaDr. DakshinkarNational Veterinary
Previous Post

पुणे : पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्त्या

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना: पंतप्रधानांच्या हस्ते लाभ वितरणाचा आज (दि.१ जानेवारी) ऑनलाईन कार्यक्रम; शेतकऱ्यांना ऑनलाईन सहभागाचे आवाहन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
kisan yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना: पंतप्रधानांच्या हस्ते लाभ वितरणाचा आज (दि.१ जानेवारी) ऑनलाईन कार्यक्रम; शेतकऱ्यांना ऑनलाईन सहभागाचे आवाहन

Sanjay khadse

कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या वारसांना सानुग्रह अनुदान; ४५० जणांचे अर्ज मंजूर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.