• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

पेपरफुटीत महेश बोटलेसह ‘न्यासा’चा सहभाग, प्रिंट केले, तेथून दलालांना पुरविल्याचे स्पष्ट

Our Media by Our Media
December 29, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
92 1
0
मंगल कार्यालयात मुले जमवून भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याने पेपर फोडला
34
SHARES
663
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

पुणे : आरोग्य भरतीतील गट ‘क’ चा पेपर फोडण्यात मुंबई आरोग्य विभागाच्या कार्यालयाचा सहसंचालक डॉ. महेश बोटले याच्यासह ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या न्यासा कंपनीचा हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्‍न झाले आहे. न्यासाने जेथे पेपर प्रिंट केले, तेथून तो दलालांना पुरविल्याचेही स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी दोन प्रमुख दलालांना अटक केली आहे.

निशीद रामहरी गायकवाड (वय 43, रा. शेवाळकर गार्डन, नागपूर, मूळ रा. एशियाड कॉलनी, अमरावती) आणि राहुल घनराज लिघोंट (35, रा. देवी पार्क, अमरावती) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 1 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पेपर पुरविल्यानंतर आठ ते दहा लाख रुपये उमेदवारांकडून घेतल्याचे तपासात आढळले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. बोटले व न्यासा कंपनीकडून प्रश्‍नपत्रिका फुटल्याचे निष्पन्‍न झाले आहे. या गुन्ह्यातही आरोग्य विभागाच्या लातूर कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बगडिरे, अंबाजोगाईतील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप यांचा समावेश असल्यामुळे त्यांना आरोपी केल्याचे पोलिस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

आरोग्य भरतीच्या गट ‘ड’मधील पेपरफुटी प्रकरणातील आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये गट ‘क’चा ही पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. गट ‘क’चा पेपर 24 ऑक्टोबर रोजी, तर गट ‘ड’ची परीक्षा 31 ऑक्टोबरला झाली होती. आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेकावकर यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा तपास करताना हा प्रकार उघड झाला आहे. आरोग्य विभागाचा गट ‘ड’ वर्गाचा पेपर फोडल्याच्या आरोपावरून डॉ. बोटले, बडगिरे, डॉ. जोगदंड यांच्यासह 18 जणांना अटक केली आहे.

आरोग्य विभागाच्या ‘ड’ वर्ग परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेतील 100 प्रश्‍नांपैकी 92 प्रश्‍न परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणात आरोपींकडून लॅपटॉप व मोबाईल जप्त केले आहेत. या सर्व गोष्टींचा तपास केल्यानंतर पोलिसांना गट ‘क’चा पेपर फोडल्याचे निष्पन्‍न झाले. या गुन्ह्यात आता अटक केलेले आरोपी गायकवाड व लिघोंट यांनी आरोग्य विभाग गट ‘क’ परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका फोडून दलालांमार्फत पैसे घेतल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

पाच गुन्ह्यांत 28 जणांना अटक; सहा कोटी जप्त

पुणे सायबर सेल पोलिसांनी आरोग्य विभाग, म्हाडा आणि टीईटी प्रश्‍नपत्रिका फुटीप्रकरणी आतापर्यंत सहा गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये 28 आरोपींना अटक करून आतापर्यंत सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील सर्वांत जास्त रोकड टीईटी गैरव्यवहार प्रकरणात जप्त केली आहे.

400 ते 500 विद्यार्थ्यांना पेपरचे वाटप

बोटलेचा पेपर सेट करणार्‍या समितीत समावेश आहे. पेपर छपाईच्या ठिकाणावरून त्याने पेपर फोडून परीक्षेपूर्वीच 400 ते 500 परीक्षार्थींना पैसे घेऊन पेपरचे वाटप केले. यासाठी काही क्लास चालकांनाही त्याने हाताशी धरले होते.

Tags: Health Exam paper LeakMahesh Botle
Previous Post

अवकाळी पाऊस, गारपीट: तात्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे आदेश

Next Post

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

सुप्रिम

विमा काढलाय तर, मेडिक्लेमचा लाभ द्यावाच लागेल : सुप्रीम कोर्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.