अकोला : दि.25: शासनाच्या विविध विभागाव्दारे अल्पसंख्यांकासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा आढावा आज घेण्यात आला. अल्पसंख्यांक समाजाच्या सर्व घटकापर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.
जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. यावेळी जिल्हा अग्रीम बँकेचे व्यवस्थापक आलोक तेराणीया, नगरप्रशासनचे सुप्रिया टवलारे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा कौशल्य विभाग, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, नगरपालिका प्रशासन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सामाजिक न्याय विभाग अशा विविध विभागाने अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ मिळत आहे का? याची खात्री करा. अल्पसंख्यांक समाजातील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवा. तसेच किती लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहे याची माहिती तातडीने सादर करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.