अकोट :(देवानंद खिरकर):- सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या जिवन मारणाशी निगडित अत्यांत महत्वाच्या मागण्यांसाठी अनेक राजकीय दबावाला व झुगारून महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समितीचे हिवाळी अधिवेशनावर लक्षवेधी धरणे आज पासून समितीचे संस्थापक अध्यक्ष नेताजी अरुण जाधव, प्रदेशाध्यक्ष बालासाहेब भाबट खादगावकर व सावकारग्रस्त शेतकरी बहुउद्देशीय सेवा समिती चे अध्यक्ष तथा विदर्भातील सावकार पिढीत शेतकऱ्यांच्या चळवळीला बळ देणार पिढीतांचे कैवारी रमेश पाटील खिरकर यांच्या नैतृत्वात सुरू झाले आहे.
या वेळी समितीने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वाजीत कदम, शेकाप चे भाई जयंत पाटील व धर्मवीर आ. संजय गायकवाड यांना सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी विधिमंडळात लक्षवेधी सूचना शून्य काळामध्ये चर्चा किंवा तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची मागणी सावकारग्रस्त शेतकरी समितीने केली आहे.
या हिवाळी अधिवेशनात सावकारग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा सावकारग्रस्त शेतकरी समितीचे विदर्भातील नेते मा. रमेश पाटील खिरकर यांनी व्यक्त केले आहे.