तेल्हारा प्रतिनिधी शुभम सोनटक्के
ग्रामीण भागातील महिलांना कलेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्या आत्मनिर्भर होऊन त्या प्रगतीच्या वाटेवर चालाव्यात या साठी युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार,नेहरू युवा केंद्र अकोला,कौशल्य विकास एज्युकेशन बेस कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद युवा बहुद्देशीय मंडळ पाथर्डी च्या वतीने मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण चे उदघाटन पाथर्डी येथे करण्यात आले.
शिलाई मशीन प्रशिक्षण वर्गाच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सरपंच सौ रजनी वसो व प्रमुख अतिथी ग्रामपंचाय सदस्या सौ कमल वयले,सौ माधुरी डाबेराव, ग्रामपंचायत सदस्य हरीचंद्र राऊत,रामदास नावकार, तंटा मुक्त समिती अध्यक्ष प्रफुल दबडघाव, यांच्या उपस्तीत सम्पन्न झाला.
या प्रशिक्षण वर्गाला लाभलेल्या परिशिका प्रीती बेरळ यांचा सत्कार करण्यात आला
माजी सरपंच सौ रजनी वसो महिलांनी चूल आणि मूल यावरच न थांबता उधोग,वेवसाय कडे वडून आत्मनिर्भर बनाव असे मनोगत उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून वेक्त केले
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद,आध्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून विजय दिवसा च्या निमित्याने शहिद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद युवा बहुद्देशीय मंडळ पाथर्डी चे अध्यक्ष प्रदीप उर्फ बंटी राऊत यांनी केले तर सूत्र संचालन राष्टीय स्वयंसेवक शुभम राऊत यांनी केले तर आभार रोशन नेरकर यांनी मानले . या कार्य यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी ,मयूर खंडेराय,गोपाल राऊत ,श्रद्धा राऊत, शंकर विधळे, योगेश नेमाडे,प्रदीप तायडे,निखिल बेरळ, मंगेश मामनकार,स्वागत झापर्डे,शाम जामोदे,श्री गजानन महाराज मंदीर पाथर्डी व विवेकानंद युवा बहुद्देशीय मंडळ पाथर्डी महिला युवती-युवक व गावकरी यांचे सहकार्य लाभले