अकोला: अकोला जिल्हा परिषद अंतर्गत अंतर्गत येणारे पंचायत समिती तेल्हारा येथील तळेगाव बाजार येथे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मध्ये वर्ग 1 ते 8 जून विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या 105 आहे. आणि त्यावर फक्त एक शिक्षक पूर्णवेळ कार्यरत असून दोन शिक्षक प्रतिनियुक्तीने असे, फक्त तीन शिक्षक काम करीत आहेत. शाळा व्यवस्थापन समिती तळेगाव बाजार यांनी शिक्षकांची रिक्त पदे करण्यासाठी आणि अल्पसंख्यांक पालकांचे पाल्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये. म्हणून जिल्हा प्रशासनाकडे आणि महाराष्ट्र शास्त्र तळे राज्यपाल शिक्षण मंत्री ग्राम विकास मंत्री तसेच पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली असून, जिल्हा परिषद उर्दू शाळा तळेगाव बाजार येथे मागील एक वर्षापासून 105 विद्यार्थ्यावर वर्ग 1 ते 8 शिकवण्यासाठी फक्त एक शिक्षक पूर्णवेळ कार्यरत आहे.
तरी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक वर्गाकडून जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आला, आणि त्याच्यात शिक्षकांची मागणी करण्यात आली जर शाळेला सदरहू शाळेला पूर्णवेळ पूर्ण शिक्षक न दिल्यास शाळा जिल्हा परिषद येथे भरवण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. जिल्हा प्रशासन याची काय दखल घेते, याकडे तळेगाव बाजार येथील सर्व पालकांचे लक्ष आहे.