अकोला,दि.७: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या दंतशास्त्र व कान नाक घसा बाह्य रुग्ण विभागामध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी मुख कर्करोग आरोग्य शिबीर घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी कळविले आहे.
विविध व्यसने व धावपळीच्या दिनचर्येमुळे मौखिक आजार मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहेत. त्यात मुख पुर्वकर्क रोग, कर्करोग, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांची तपास्णी करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आरोग्य शिबीर नियमित वेळेत होणार आहे. तसेच दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी शालेय विद्यार्थ्यांची नाक, कान, घसा तपासणी केली जाणार आहे. हे शिबीर दंत चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश नैताम, नाक, कान घसा शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. राजश्री खंडारे यांच्या देखरेखीखाली राबविले जाईल. या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी केले आहे.