अकोला, दि.4 : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण मोहीमेची जनजागृती व्हावी, याकरीता आज (दि.4रोजी) सकाळी साडेसात वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीत जास्तीत जास्त संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
सायकल रॅलीचा मार्ग याप्रमाणे : सकाळी साडेसात वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथून सायकल रॅलीचा शुभारंभ व मार्गस्थ होईल. त्यानंतर सरकारी बगीचा-जयहिंद चौक-छोटा पूल-सावताराम मिल रोड-मानिक टॉकीज-संतोषी माता चौक- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम येथे आगमन व सकाळी नऊ वाजता रॅलीचे समारोप होईल. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी व कार्यक्रमाचे संयोजक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदि उपस्थिती राहणार आहे.