अकोला,दि.4 : डाक सेवेबाबत तक्रार सहा आठवड्यापेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असेल अशा तक्रारींने निवारण करण्यासाठी बुधवार दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय, अकोला विभाग, सिव्हिल लाईन अकोला येथे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीस तक्रारदाराने स्वत:च्या खर्चाने उपस्थित रहावे. सोबत अनुत्तरीत तक्रारीबाबतचा अर्ज व त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिकाऱ्याकडे दाखल केली आहे.
त्यांचा हुद्दा, व दाखल केल्याची तारीख, एका अर्जासोबत एकच तक्रार असावी. आपली तक्रार प्रवर अधिक्षक, अकोला यांच्याकडे शुक्रवार दि. १० पुर्वी समक्ष अथवा पोस्टाने पाठवावी, असे आवाहन डाक कार्यालयाचे प्रवर अधिक्षक,अकोला यांनी केले.