अकोला,दि.1 श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्याव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पथनाट्याव्दारे मतदार जनजागृती कार्यक्रम सादर केले. पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन असे पथनाट्य शहराच्या महत्वाच्या ठिकाणी सादर करुन मतदार जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) सदाशिव शेलार, बाबासाहेब गाडवे, गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, श्रीमती एलआरटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एल. येऊल, डॉ. एम. जे. साबू, डॉ. एन. एन. चोटिया, डॉ. एन. एम. गुट्टे आदि उपस्थित होते.
तसेच या पथनाट्यामध्ये तेजस घोडे, अश्विनी कुळकर्णी, राहुल पोपळघट, राधा इंगळे, शिवानी नागे, निरंजन देशमुख, प्रिया सरदार यांनी सादर केले.