अकोला : शेतमालाचे गोडावून फोडुन सोयाबीन चोरी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून तीन गुन्हे उघडकीस आणले. या कारवाई तब्बल सात लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेतमालाची गोडाऊन फोडून धन्यवाद चोरी करणाऱ्या गुन्हेगार शेख रफीक शेख बसीर रा. संजय नगर नायगांव यास ताब्यात घेवून विचारपुस केली. यावेळी त्याचे साथीदार सैयद अमीन सैयद अली रा.भारत नगर अकोट फैल, सलीम शाह रा. बाभळी दर्यापुर जि. यांचे मदतीने बोरगांव मंजु, मुर्तिजापुर ग्रामीणमध्ये सोयाबीन चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 2 लाख 65 हजार 450 रुपयांची 44.20 क्विंटल चोरी करून विकलेली सोयाबीन, 5 लाखाचे एम एच ३० बी डी ०६१७ क्रमांकाचे वाहन व इतर मुद्देमाल असा एकूण 7 लाख 65 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील दोन आरोपी फरार असुन आरोपी नामे शेख रफीक शेख बसीर संजय नगर यास बोरगांव मंजु पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले पोउपनि गोपाल जाधव, एएसआय दशरत बोरकर, गोकुळ चव्हाण, स्वप्नील खेडकर, लिलाधर खंडारे, शेख अन्सार चालक, दिलीप पवार यांनी केली.