तेल्हारा:-तेल्हारा तालुक्यातील ईसापुर येथील प्रज्ञाबुध्दविहारामध्ये संविधान दिनाचे औचीत्य साधुन भारताचे संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणी विहाराचा ९ वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला.
या विहारामध्ये ईसापुरचे भुमीपुञ आपले गावाशी नाळ जुळलेले अण्णासाहेब बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड व प्रज्ञाताई बोदडे यांणी या विहारामध्ये २०१२ मध्ये तथागत भगवान बुध्दांची अष्ट धातुची १२५ किलो वजनाची मुर्ती त्यांचे वडील यशवंत बोदडे आई देवकाबाई यांचे स्मरणार्थ दाण देवुन याच ठिकाणी त्यांचे बंधु अशोक बोदडे यांचे स्मरणार्थ अभ्यासीका तसेच जिल्हापरिषद शाळा डिजीटल करण्यासाठी मदत करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला या विहाराच्या वर्धापण दिनानिमित्य विविध कार्यक्रमाच्या,माध्यमातून सुप्रसिध्द,गायक प्रबोधनकार, भगवान सिरसाट कुणाल वराडे, भगवान गावंडे,प्रज्ञा इंगळे, महेंद्र सावंग अॕड.अनंत खेडकर, तुषार सुर्यवंशी विजय इंगोले, यांचे प्रबोधनपर कार्यक्रम घेतले तसेच २०१७ मध्ये याच ठिकाणी भव्य धम्म मेळावा घेवुन वंचित,बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॕड. बाळासाहेब आंबेडकर यांणा निमंञीत केले होते त्यावेळी हजारो नागरीक उपस्थित होते परंतु गेल्या दोन वर्षापासुन कोरोना असल्यामुळे या विहाराचा वर्धापण दिन होवु शकला नाही परंतु यावर्षी ग्रामपंचायत ईसापुर,व भिमयोध्दा मंडळ महीला मंडळ तसेच बौध्द,बांधवाच्या वतीने या विहारमध्ये संविधान,प्रास्थाविकेचे. वाचन करुन वर्धापण दिन साजरा,करण्यात आला यावेळी ईसापुर गावच्या प्रथम नागरीक सरपंच मिराताई बोदडे, उपसरपंच महादेवराव नागे, ज्ञानदेवराव बोदडे,महादेवराव बोदडे ,संजय बोदडे, खंडुजी घाटोळ, मुकिंदा बोदडे, लखुजी घाटोळ,शामराव मोरे,कमलबाई बोदडे , लताबाई बोदडे, चंफाबाई बोदडे,रमाबाई बोदडे,अॕड.सिमा हेरोडे, सुर्यकांताबाई हेरोडे , अंजनाबाई बोदडे, पञकार आनंद बोदडे ,खंडुजी घाटोळ, धम्मपाल बोदडे, मिलिंद बोदडे, शरद बोदडे, संघपाल ससाने सोनु मोडोकार,तसेच भिमयोध्दा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते