अकोला- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२१ साठी प्राप्त नामनिर्देशन पत्रे माघारी घेण्याच्या अंतिम दिवसानंतर दोघे उमेदवार रिंगणात आहेत,असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.
उमेदवारांची नावे या प्रमाणे-
गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया (शिवसेना), वसंत मदनलाल खंडेलवाल(भाजपा).आता अंतिमतः हे दोघे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
आता निवडणूक कार्यक्रमानुसार, शुक्रवार दि.१० डिसेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या दरम्यान मतदान होणार असून दि.१४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.