अकोला,दि.२२: जिल्हा क्षयरोग दूरिकरण व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची आज संयुक्त बैठक पार पडली. क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रुग्णांचे उपचार खंड न पडू देता नियमित असावे यासाठी सर्व संबंधित विभागांनी भर द्यावा,असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले.
या बैठकीस जागतिक आरोग्य संघटना अकोला जिल्हा समन्वयक डॉ. विरेंद्र वानखडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अलका बोरावके, मनपाच्या अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, डॉ. संजय राठोड, डॉ. मानकर, डॉ. धनंजय चिमणकर, ॲड. शुभांगी ठाकरे, डॉ. प्रिती कोगर्रे, डॉ. स्वप्निल अग्रवाल तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी क्षयरुग्ण तसेच त्यांचे संपर्कातील व्यक्तिंच्या तपासण्यावर भर देणे, क्षय रुग्णांचे उपचार पूर्ण होणे. त्यासाठीचा पाठपुरावा संबंधित यंत्रणा, औषध विक्रेते ते वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत माहिती उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे. तसेच एचआयव्ही बाधितांना व क्षयरुग्णांना आहारासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे,असेही खंडागळे यांनी निर्देश दिले.