अकोला,दि.२२: येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती अकोला येथे प्रवेश देणे सुरु झाले आहे.
त्यासाठी प्रवेश अर्जांचे वाटपही सुरु झाले आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि.२६ असून गरजू विद्यार्थिनींनी, पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती राठोड तसेच गृहपाल श्रीमती ए.पी. चेडे यांनी केले आहे.