अकोला, दि.२२: महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२१ साठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत दोघा उमेदवारांचे प्रत्येकी दोन असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.
अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे या प्रमाणे-
वसंत मदनलाल खंडेलवाल- दोन अर्ज,
गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया- दोन अर्ज.