• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

एस.टी. संप : विलीनीकरणाशिवाय मुंबई सोडणार नाही

Our Media by Our Media
November 22, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
113 1
0
एसटी

एसटी

17
SHARES
815
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : एस.टी. महामंडळात प्रामाणिकपणे सेवा दिल्यानंतर आमचे भविष्य अंधारात दिसत आहे. आमच्याप्रमाणे लेकरांचे आणि कुटुंबाचे भविष्य खराब करणार नाही. सधन भविष्यासाठी शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन हवे आहे. म्हणूनच एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार बिकट परिस्थितीत सहकुटुंब आझाद मैदानात ठिय्या देणार्‍या एस.टी. कामगारांनी व्यक्त केला आहे.

अवघ्या 9 वर्षांच्या पोटच्या पोरीसह तासगाव आगारातील महिला वाहक स्वाती सरवदे या गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसल्या आहेत. आमचे भविष्य अंधारमय असले, तरी मुलीचे भविष्य खराब होऊ देणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

त्या म्हणाल्या की, गेल्या 13 वर्षांपासून एस.टी.ची इमानेइतबारे सेवा करत आहे. मात्र, किमान वेतनाइतकाही पगार मिळत नाही. पुण्याच्या एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून पती काम करतात. त्या स्वतः तासगावला राहतात. भाड्याच्या खोलीत राहून संसार करताना मासिक खर्चाची जमवाजमव करतानाच तोंडाला फेस येतो.

मुलीच्या भविष्याच्या विचार केला, तर पैशांचा प्रश्न आडवा येतो. तिच्यासाठी महागाईचे खाणे घेऊन जाण्यासाठी खिशात पैसेच नसतात. म्हणून पाच-दहा रुपयांचे थातूर-मातूर काही तरी न्यावे लागते. म्हणूनच मुलीच्या भविष्यासाठी विलीनीकरण होऊन चांगले वेतन मिळत नाही, तोपर्यंत संपातून माघार घेणार नसल्याचा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मान आणि धन अशा दोन्ही स्तरांवर एस.टी. महामंडळाकडून पदरात उपेक्षाच पडल्याची प्रतिक्रिया आपल्या असामान्य सेवेसाठी प्रसिद्ध असलेले श्रींगोदा आगारातील वाहक सोपान जवने यांनी व्यक्त केली.

मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये लालपरीमध्ये प्रवाशांचे स्वागत करणारे सोपान जवने त्यांच्या हटके सेवेसाठी ओळखले जातात. त्यांच्यासोबत एस.टी.मधून प्रवास करताना प्रवाशांना विमानातून प्रवास करत असल्याचा भास होतो. प्रवासात प्रवाशांना मार्गदर्शन आणि विचारपूस करून वाहकाने कशाप्रकारे आदरातिथ्य करावे, याचे ते जिवंत उदाहरण आहेत.

सांगलीच्या तासगाव आगारातील राघिनी जाधव या त्यांच्या पतीसह गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. दोन्ही मुलांना उच्च शिक्षण पुरवताना कर्ज काढण्यावाचून दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

एस.टी. महामंडळात प्रामाणिकपणे सेवा दिल्यानंतर आमचे भविष्य अंधारात दिसत आहे. आमच्याप्रमाणे लेकरांचे आणि कुटुंबाचे भविष्य खराब करणार नाही. सधन भविष्यासाठी शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन हवे आहे. म्हणूनच एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार बिकट परिस्थितीत सहकुटुंब आझाद मैदानात ठिय्या देणार्‍या एस.टी. कामगारांनी व्यक्त केला आहे.

अवघ्या 9 वर्षांच्या पोटच्या पोरीसह तासगाव आगारातील महिला वाहक स्वाती सरवदे या गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसल्या आहेत. आमचे भविष्य अंधारमय असले, तरी मुलीचे भविष्य खराब होऊ देणार नाही.

त्या म्हणाल्या की, गेल्या 13 वर्षांपासून एस.टी.ची इमानेइतबारे सेवा करत आहे. मात्र, किमान वेतनाइतकाही पगार मिळत नाही. पुण्याच्या एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून पती काम करतात. त्या स्वतः तासगावला राहतात. भाड्याच्या खोलीत राहून संसार करताना मासिक खर्चाची जमवाजमव करतानाच तोंडाला फेस येतो.

मुलीच्या भविष्याच्या विचार केला, तर पैशांचा प्रश्न आडवा येतो. तिच्यासाठी महागाईचे खाणे घेऊन जाण्यासाठी खिशात पैसेच नसतात. म्हणून पाच-दहा रुपयांचे थातूर-मातूर काही तरी न्यावे लागते. म्हणूनच मुलीच्या भविष्यासाठी विलीनीकरण होऊन चांगले वेतन मिळत नाही, तोपर्यंत संपातून माघार घेणार नसल्याचा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags: MumbaiS.T. Strike
Previous Post

अकोला शहरात २३ पर्यंत रात्री ‘संचार बंदी’

Next Post

पहिली ते सातवी वर्गाच्या टास्क फोर्सच्या निर्णयावर शिक्षकांसह पालकामधून संताप

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
mumbai municipal corporation

पहिली ते सातवी वर्गाच्या टास्क फोर्सच्या निर्णयावर शिक्षकांसह पालकामधून संताप

JDCC Bank Election

JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.