• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, November 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

अमरावती दंगल प्रकरणी शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल; मोदींवर साधला निशाणा

Our Media by Our Media
November 20, 2021
in राज्य, राजकारण
Reading Time: 1 min read
113 1
0
शरद पवार
26
SHARES
814
VIEWS
FBWhatsappTelegram

गडचिरोली : अमरावती दंगलीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. आज सांप्रदायिक, जातीवादाला खतपाणी घालणारा विचार जाणीवपूर्वक वाढवला जात असून, त्रिपुरातील घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्रिपुरात काही घडल्यानंतर त्याची किंमत इथल्या लोकांनी का चुकवावी? असा सवाल करतानाच ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत त्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका ही तेल ओतून आग वाढविण्याची होती अशा शब्दात पवार यांनी हल्लाबोल केला.

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीला मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्रिपुरातील घटनेवरून भाजपवर निशाणा साधला.आज सांप्रदायिक, जातीवादाला खतपाणी घालणारा विचार जाणीवपूर्वक वाढवला जात आहे. त्रिपुरातील घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. तिथे काही घडल्यानंतर त्याची किंमत इथल्या लोकांनी का चुकवावी? ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत त्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका ही तेल ओतून आग वाढविण्याची होती असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्रिपुरातील घटनेचे पडसाद अमरावतीत आपण पाहिले. म्हणून सांप्रदायिक,जातीय तेढ आणि माणसा-माणसांत अंतर वाढविणारा, द्वेष पसरविणारा विचार जे लोक पसरवत आहेत, त्यांना खड्यासारखे बाजूला ठेवणे तुमचे कर्तव्य आहे. आदिवासी समाज या चुकीच्या प्रवृत्तींना कधीही साथ देणार नाही असेही पवार म्हणाले.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

आदिवासी तरुणांना प्रगतीपथावर आणण्यासाठी असलेल्या योजनांवर लक्ष देण्याची गरज आहे. आदिवासी वर्गामध्ये विकासात्मक बदल करण्याचा पक्षाचा विचार आहे. गेल्या वर्षी इंदौरला आम्ही मोठी आदिवासी परिषद घेतली. त्यानंतर नागपूरलाही मोठा कार्यक्रम घेतला. मागील आठवड्यात नाशिकमधील आदिवासीबहुल इगतपुरी तालुक्यात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी जमलो होतो. भांगरे यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले होते. हा त्याग आदिवासी कुटुंब करु शकते म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे पवार यांनी सांगितले. आज देशाची सूत्रे भाजपकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण त्यांनी तिथे कुठेही आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी त्यांनी वनवासी असा शब्द वापरला. हा शब्द आदिवासींना मंजूर नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ”आम्ही मूलनिवासी आहोत, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नका”, असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे. आज आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर वनसंपत्ती, जंगल याचे रक्षण केले गेले पाहीजे. आदिवासी समाज हा जल, जंगल आणि जमीन या तीन गोष्टींचे संवर्धन करत आहे असेही पवार यांनी सांगितले.

राज्यात, देशात जे जलसंपदा प्रकल्प झाले, त्यात जास्तीत जास्त आदिवासींची जमीन गेली. आदिवासींच्या क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा झाला आणि त्याचा फायदा इतर क्षेत्रांना झाला. पर्यावरणाची राखण करणारा वर्ग म्हणून आदिवासींची ओळख असल्याने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असला पाहीजे. शेती हा आपला महत्त्वाचा धंदा आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा ८०% लोक शेती करत होते. आज देशाची लोकसंख्या १०० कोटींच्या पुढे गेली व शेती करणाऱ्यांची संख्या ६०% झाली. याचा अर्थ शेती करणाऱ्यांची संख्या कमी झाली. विकासासाठी जमिनी वापरल्या गेल्यामुळे साहजिकच शेतीसाठीची जमीन कमी होत गेली.म्हणून या वर्गाला मदत करणारे धोरण आखणे गरजेचे आहे. धानाला बोनस देण्याची भूमिका खासदार प्रफुल पटेल यांनी मांडली असे सांगून, महाविकास आघाडीने दोन वर्षे बोनस दिला. मात्र कोरोनानंतर बोनस देणे अवघड झाले. केंद्राकडून जीएसटीचा परतावा मिळाला नाही. तरीही शेतकऱ्यांच्या धानाला काही ना काही बोनस मिळाला पाहीजे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषी मंत्री आणि विदर्भातील मंत्र्यांशी एकत्र चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची असली तरी कर्ज काढा आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज थोडे कमी करा, अशी आमची सरकारला विनंती असेल. गेले वर्षभर देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. ऊन, थंडी, पाऊस याचा विचार न करता आपल्या मालाला योग्य किंमत मिळावी म्हणून शेतकरी आंदोलन करत आहेत. जो शेतकरी सर्वांच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सोडवतो. त्याने काही मागणी केली तर केंद्र सरकार तिकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. संसदेच्या पुढील अधिवेशनात हा प्रश्न आम्ही सरकारपुढे मांडणार असून, सरकारने दखल घेतली नाही तर दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले आंदोलन देशात इतर ठिकाणी करावे लागेल. असा इशारा पवार यांनी दिला. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. विदर्भात राष्ट्रवादीला कमीत कमी तीन मंत्री तरी मिळावेत अशी इच्छा होती. पण आम्हाला ते मिळू शकले नाहीत, कारण जागा कमी होत्या.आमची इच्छा ही की होती तिसरी जागा धर्मरावबाबा आत्राम यांना द्यावी. याआधी त्यांनी मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. पण जागा कमी असल्यामुळे त्यांना जागा देता आली नाही, हे दुःख आमच्या मनात आहे. ते दुःख आम्ही कधी ना कधी दूर करु. पुढच्या निवडणुकीत धर्मराव बाबांना लोकसभेला पाठवायचं आणि भाग्यश्रीला विधानसभेत निवडून द्यायचं असेही पवार यावेळी म्हणाले. सरकार बनल्यानंतर जिल्हा परिषदेचा अनुभव असल्यामुळे भाग्यश्री यांना अधिक काम करण्याची संधी राज्य पातळीवर द्यावी. अशी पक्षाची इच्छा आहे. त्याला इथल्या जनतेची साथ मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जि.प. पंचायत समिती व नगरपरिषदेच्या जागांपैकी ५० टक्के जागांसाठी सर्वसाधारण कुटुंबातील महिलांना संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Tags: AmravatiBJPSharad Pawar
Previous Post

शिवसेनाप्रमुखांना मुंबई महापालिका सभागृहात जागा नाही

Next Post

चंद्रपूर : ताडोबात माया वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम
Featured

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
Next Post
Forest Guard Killed

चंद्रपूर : ताडोबात माया वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

Andra Pradesh

Andhra Pradesh Floods : आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू, १०० बेपत्ता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.