• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

शिवसेनाप्रमुखांना मुंबई महापालिका सभागृहात जागा नाही

Our Media by Our Media
November 20, 2021
in राज्य, राजकारण
Reading Time: 1 min read
98 1
0
mumbai municipal corporation
15
SHARES
705
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात अन्य नेत्यांच्या पुतळ्यांसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यास पालिका प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे.

मुख्य सभागृहातील अन्य नेत्यांच्या पुतळ्यांच्या रांगेत आणखी पुतळा बसवण्यास जागाच शिल्लक नसल्याचे सांगत पालिका प्रशासनाने शिवसेनाप्रमुखांचा पुतळा पालिका सभागृहात बसवण्यास नकार दिला आहे. सभागृहात शिवसेनाप्रमुखांना जागा नाही, असे एकीकडे सांगताना पुतळा बसवायचाच असेल तर, तो स्थायी किंवा अन्य समिती सभागृहात बसवण्यात यावा, असा पर्यायदेखील प्रशासनाने सुचवला आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मुंबई महापालिका ऐतिहासिक सभागृहात नगरसेवकांसह अधिकार्‍यांना बसायलाही जागा अपुरी पडत आहे. त्यात सभागृहात बसवण्यात आलेल्या नेत्यांच्या पुतळ्यांमुळे जागा अधिकच व्यापली गेली आहे. अशा परिस्थितीत या सभागृहात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा बसवण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे शिवसेनेने केली होती. त्यावर प्रशासनाने आता लेखी अभिप्राय दिला आहे.

सध्या सभागृहात हात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह 13 पुतळे आहेत. उपलब्ध क्षेत्रफळाच्या जागेमध्ये 247 जणांच्या बैठकीची व्यवस्था आहे. आता अजून 9 नगरसेवक वाढणार असल्यामुळे सध्याचे ऐतिहासिक सभागृह अपुरे पडणार आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वि. वा. शिरवाडकर, सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध मान्यवरांचे पुतळे बसवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत असली तरी नवीन अर्धपुतळ्यांसाठी जागा उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.

त्यामुळे महापुरुषांचे नवीन पुतळे पालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृह व अन्य समिती सभागृहात लावण्यात यावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या बसवलेल्या पुतळ्यांपैकी कोणताही पुतळा शिवसेनाप्रमखांसाठी हटवला जाणे शक्य नसल्याने शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला स्थायी समितीमध्ये विराजमान व्हावे लागणार आहे. नवे पुतळे नेमके कुठे बसवावेत यासंदर्भात लवकरच सर्व पक्ष गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Tags: BJPMumbai Municipal Corporation
Previous Post

एस. टी. संपकर्‍यांना घरचा रस्ता दाखवत नवे कर्मचारी दाखल

Next Post

अमरावती दंगल प्रकरणी शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल; मोदींवर साधला निशाणा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
शरद पवार

अमरावती दंगल प्रकरणी शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल; मोदींवर साधला निशाणा

Forest Guard Killed

चंद्रपूर : ताडोबात माया वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.