अकोला,दि.17: केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2019-20 नामांकनाकरीता प्रस्ताव मागविण्यात आले आहे. नामांकन प्रस्ताव केंद्र शासनाच्या https://innovate.mygov.in/national-youth-award-2020.
या ऑनलाईन पोर्टलवर गुरुवार दि. 18 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे सादर करावे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले.