मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण करावे यासाठी मागील 15 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खुप मोठे विधान केले आहे. शरद पवार निफाड (Niphad) दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य करताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) स्पष्ट मत व्यक्त केले.
परिवहन मंत्र्यांनी मला दिलेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers Strike) सात प्रश्न होते. त्यातील मुख्य प्रश्न महागाई भत्ता (DA) हा होता. त्यातील विलिनीकरण ही मागणी सोडली तर सर्व मागण्यांवर एकवाक्यता झाली आहे. परंतु विलिनीकरणाची मागणी मान्य झालेली नाही. विलिनीकरणाची मागणी करणं ह्याचा अर्थ मालक बदलण्याची मागणी करणं असा आहे. एखाद्या संस्थेकडं आपण नोकरी मिळवायची आणि काही दिवसांनी माझी नोकरी दुसऱ्या मालकाकडं वर्ग करा असं म्हणायचं, असं कधी नोकरीमध्ये करता येतं का? असा प्रश्न शरद पवार यांनी केला आहे. कामगारांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवले पाहिजेत. परंतु जिथं तुम्ही नियुक्त झाला तिथून दुसरीकडं वर्ग करा, हे म्हणणं पूर्ण करण्यासारखं आहे असं मला प्रथमदर्शनी दिसत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले, एसटीच्या संपाला उच्च न्यायालयानेही (High Court) मनाई केली आहे.
त्यावर सुनावणी ही सुरू आहे.
असं असताना संघटनांनी संपावर ठाम राहणे हे कामगारांचं नुकसान करण्यास मदत करण्यासारखं आहे.
एसटीच्या संघटना (ST Association) व
सरकारमधील (Maharashtra Government) प्रतिनिधींनी एकत्र बसून यावर मार्ग काढायला हवा.
नागरिकांचा त्रास वाढला आहे. कार्तिकी एकादशीला (Kartiki Ekadashi) शेकडो लोक जाताहेत.
त्यांना याचा त्रास होतोय, याकडंही शरद पवार यांनी लक्ष वेधलं.