अकोला : सैनिक हो तुमच्यासाठी संविधानाच्या सर्वक्षणार्थ सैनिक समाज बनविणे हाच सैनिक फेडरेशन चा मुख्य उद्देश आहे. अशी माहिती सैनिक फेडरेशन चे मा. खा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दीली. काल ते अकोला दौऱ्यावर असतांनि माध्यमाशी बोलतांनी सैनिक आणि माजी सैनिक हे देशाचे सर्वांत महत्वाचा अंग आहे. देशात कुठलीही आपती येवो नैसर्गिक असो किंवा सुलतानी असो देशाची अंतिम शक्ती हि भारतीय सेना आहे. वास्तविक सैन्यदलाचे काम हे देशाचे रक्षण करणे आहे. पंजाब आसाम नागालैंड मणिपूर मिझोराम अश्या अनेक भागात बंड मोडून काढण्याचे काम सैनिकांनी केले आहे. आज देखील काश्मीर आणि अन्य भागात सैन्य दहनातवाद्यांचा मुकाबला करत आहे.
सैनिकांच्या कुटुंबावर काय संकट येत असेल त्याची कल्पना कुणालाच नाही तसेच आज आपले सैनिक देशाच्या सीमेवर अत्यंत कठीण परिस्थितीत राहत आहेत हवा तुरळक असते त्या १८००० उंचीवर कसे जगतात ही कल्पना पण कुणाला नाही. यात त्याचे कुटुंब बिना सहारा राहते समाजकंटक त्यांच्या कुटुंबावर अत्याचार करतात पण संरक्षण नाही. उलट एकता कपूर सारखे लोक चित्रीकरण करून व्यभिचार दाखवतात परिचारक सारखा आमदार गलिच्छ भाषण करतो. आणि सैनिकांच्या स्त्रियांना बदनाम करतो पण समाज उठून उभा राहत नाही एक प्रशिक्षित सैनिक निवृत्त झाल्यावर कुठलेही काम करू शकतो. पण दुर्दैवाने माजी सैनिकांचा उपयोग करून घेण्याची मानसिकता सरकारमध्ये नाही. सैनिकांचा कौशल्य क्रीडा सुरक्षा नैसर्गिक आपत्ती दहशतवाद गुन्हेगारी पर्यावरणाचे संरक्षण अश्या अनेक विषयात काम करू शकतो.
इतिहासात दोनदाच एका सदस्याने अशी समिती गठीत केली तीही माजी सैनिकांच्या कल्याणासाठी त्या सैनिकांसाठी अनेक विषया वर सूचना मांडण्यात आल्या आहेत त्यात सर्वात महत्वाची सूचना मी केली होती की प्रत्येक जिल्हा पोलीस संचालक म्हणजे या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी त्याचे सरकारी आदेश देखील काढण्यात आले तसेच प्रत्येक तालुक्यात पोलीस निरीक्षक अध्यक्षतेखाली समिती असावी पण ती काही झाली नाही’ आता आम्ही सैनिक फेडरेशन बनविले आहे प्रत्येक तालुक्यात सैनिक फेडरेशन या दक्षता विभाग राहील तरी सरकारने नियमा प्रमाणे अशी समिती बनवून दुसरीकडे सैनिक ३५ वर्षाच्या आसपास निवृत्त होतो मग नोकरीसाठी दर भटकतों ही ब्रिटिश कालीन पद्दत आहे स्वतंत्र भारताचे कायदे आणि नियम संविधान आधारित आहेत. सर्वांना समान न्याय आणि अधिकार आहेत त्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सैनिकाला ही ५८ वर्ष पर्यंत नोकरी मिळाली पाहिजे सैनिकाला सैन्यात असताना दुसऱ्या सरकारी नोकरीत सेवाज्येष्ठता सकट लाभली पाहिजे मी केंद्र आणि राज्य सरकारकडे अनेकदा मागणी केली आहे कि २० वर्ष सैन्यात नोकरी झाल्यावर सैनिकाला पोलिसात किंवा इतर सेवेत कुठलीही चाचणी व परीक्षा न घेता सरळ घ्यावे जसे पोलिसात सैनिक उपयोगी ठरेल पोलिसांना एक अनुभवी प्रतिक्षित माणूस मिळेल मग आतंकवादी आल्यावर नोव्हेंबर २००८ सारखेच पोलिसांना हतबल व्हावे.
सैनिक सीमेवर लढतों येवढेच न्हवे तर सियाचीन कश्मिर सारख्या ठिकाणी अनंत यातना भोगत कुटुंबापासून दूर राहतो. त्याच्या कुटुंबाला आधार नसतो. समाजकंटक त्यांना त्रास देतात नुकताच मनोज अवटी या शूर सैनिकाची हत्या झाली गृहमंत्र्यांना अनेक वेळा भेटून झाल्यावर हे प्रकरण पुढे गेले. कारवाई झाली असे प्रकार होऊ नये म्हणून मी आमदार असताना विधान परिषद आणि विधान सभेच्या आमदारांची समिती गठीत १८९ या विधान परिषद नियम्माखाली केली.
आता नुकतेच मी सरकारकडे सैनिकांसाठी ज्या जागा आहेत त्यात तरी त्यांना घेण्यासाठी विनंती केली जसे १२०० जागा शिक्षक म्हणून सैनिकांना मिळाल्या पाहिजेत.
हिमालयत’ राजस्थान दिल्ली मध्यप्रदेश येथे १५ कोटी झाडे लावली माजी सैनिकांना नोकरी मिळाली व झाडे पण जगली २ बटालियन प्रादेशिक सेनेची कंपनी औरंगाबाद येथे बनवली आता दुसरी मंजूर झाली आहे अश्या महाराष्ट्रात ४ बटालियन ची मागणी केली आहे.
सैनिकांचे हीत हे नव्याने स्थापन झालेल्या सैनिक महसंघाचे किंवा फेडरेशन कर्तव्य आहे सैनिकांच्या मुलांचे शिक्षण नोकरी प्रगती आपण बघत पाहिजे त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठीच आम्ही सैनिकांच्या मागण्यांसाठी खाजगी वीणा अनुदान आणि सर्व शाळा कॉलेजमध्ये जागा ठेवल्या आहेत श्री उदय सामंत यांनी नव्याने सरकारी आदेश काढून
मेस्को महाराष्ट्रात सैनिकना साठी निर्माण झालेली आहे त्यामध्ये कश्याप्रकारचा भ्रष्टाचार होत आहे मेस्को चा उद्देश सैनिकांना उद्योजक बनवण्यासाठी होता पण सैनिकांना गार्ड म्हणून घेतल्या जाते त्यांचा वेळेवर पगार होत नाही त्यामध्ये त्यांना प्रमुख्याने नोकरी मिळत नाही याविषयी मेस्को कडे लक्ष देणे हा सैनिक फेडरेशनचा एजेंडा आहे सैनिक आपली सैन्यातील सेवा करून राज्य सरकारमध्ये पुनर्नियुक्त होतात.
त्यांच्याजवळ काम करण्यासाठी दहा बारा वर्षे शिल्लक असतात त्यामध्ये त्यांचे प्रमोशन होत नाही त्यांचे प्रमोशन होण्यासाठी त्यांना प्रत्येक पाच वर्षांनी मोशन व्हावे यामुळे सैनिकांचे मनोबल व सेवेमध्ये त्यांचे योगदान वाडेल. एम. पी. एस. सी. च्या मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा मध्ये आज पर्यंत सैनिकांचा कोटा राखीव होता. पण मागील काही वर्षांपासून व्यवस्थित रित्या सैनिकांचा हा कोटा एमपीएससी मचून गत आता आहे. तो कोटा एमपीएससी मध्ये सैनिकांसाठी असला पाहिजे ही सैनिक फेडरेशन की भूमिका आहे. हा लढा सन्मानाचा आहे. समाजात सैनिकाचा सन्मान झाला पाहिजे त्यासाठी सरकारने बैठक घेवून ह्या सर्व मागण्याचा विचार करावा. सैनिकाना सन्मानाचे जीवन मिळवून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत राष्ट्रीय अध्यक्ष सैनिक फेडरेशन श्री. डी. एफ. निंबाळकर महासचिव सैनिक फेडरेशन, श्री. रवींद्र घनबहादूर उदोग सचिव सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, श्री. भारत वानखडे विभागीय उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन अमरावती विभाग, श्री. समाधान तायडे कार्याध्यक्ष अकोला, श्री. मुरलीधर पातोडे उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन अकोला, उमेश सुरेशराव इंगळे परिवर्तन स्वाभिमानी संघटना संस्थापक अध्यक्ष, समाज क्रांती आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष हंसराज शेंडे साहेब, समाज क्रांती आघाडी चे महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडु दादा वानखडे, परिवर्तन स्वाभिमानी संघटना महासचिव सतिश तेलगोटे, आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.