अकोला : दत्त कॉलनी मध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सप्ताहाच्या सहाव्या दिवसाला संगीतमय श्रीमद् भागवत कथेला आमदार अमोल दादा मिटकरी यांनी सदिच्छा भेट दिली. व उपस्थित भाविकांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा समर्पित करून धन्य आजी दिन संत दर्शनाचा हा अभंग वारकरी चाली मध्ये म्हणायला सुरुवात केली, आणि भागवत मंडपामध्ये आमदार साहेब भजन म्हणत आहेत. हे पाहून कथेतील सर्व श्रोते भजनात तल्लीन होऊन डोलायला लागले याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक श्री गणेश पाटील लांडे यांनी आमदार अमोल दादा मिटकरी यांचा सत्कार केला.
कथेचे सहाव्या दिवसाचे वाक पुष्प गुंफताना विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य ह. भ. प. श्री. गणेश महाराज शेटे यांनी सांगितले गेले दोन वर्ष कोरोना काळामध्ये जेवढे विवाह सोहळे झाले तेवढे अगदी साध्या पद्धतीने आणि फार कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत व कमीत कमी खर्चा मध्ये पार पडले पण या आधीचे लग्न सोहळे झाले त्या लग्न सोहळा मध्ये कितीतरी पटीने विनाकारण खर्च करणं चालू असतो आणि त्या केलेल्या खर्चाची जड मुलीच्या वडिलांना आयुष्यभर कर्ज फेडण्याच्या माध्यमातून भरत राहावे लागते.
म्हणून जर कोरोना काळामध्ये ज्याप्रमाणे कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पडले तसे पद्धत जर कायमस्वरूपी ठेवली तर भविष्यात कुठल्याही मुलीचा बाप कर्जबाजारी होणार नाही असे मनोगत भागवत कथेतील श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा प्रसंगी भागवत कथेच्या माध्यमातून गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केले.
ह. भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज नावकार यांच्या व्यासपीठ नेतृत्वात श्री गजानन विजय ग्रंथ पारायण पार पडले अशी माहिती सप्ताहाचे आयोजक गणेश पाटील लांडे यांनी दीली.