अकोला: दि.15 सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालविण्यात येणारे मुर्तिजापूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. मागासप्रवर्गातील होतकरु मुलींना गणुवत्तेनुसार व जाती निहाय इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या परीक्षेत प्रवेश देण्यात येणार आहे. वसतीगृहात प्रवेशितांना मोफत भोजन, निवासव्यवस्था, शैक्षणिक साहीत्य, निर्वाह भत्ता व स्वच्छता भत्ता दिला जातो.
तरी इच्छुक गरजु मुलींनी किंवा पालकांनी गृहपाल मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृह मुर्तिजापूर येथे दि. 22 नोव्हेंबरपर्यंत प्रवेशाकरीता आवेदनपत्र भरुन द्यावे. उशीरा प्राप्त अर्जाचा विचार केल्या जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असे मुर्तिजापूर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी कळविले आहे.