अकोला: दि.३: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२१ पर्यंतचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले असून हे अनुदान तालुकास्तरावर वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार संजय गांधी निराधार योजना मीरा पागोरे यांनी दिली आहे.
या अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रिय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना-१ कोटी २९ लाख ३० हजार८०० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना- तीन लाख एक हजार १०० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन योजना-दोन लाख ५६ हजार २०० रुपये, संजय गांधी अनुसूचित जमाती योजना-दहा लक्ष रुपये, श्रावण बाळ अनुसूचित जमाती योजना ४४ लाख दोन हजार ४०० रुपये, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना-३५ लक्ष रुपये, असे एकूण दोन कोटी २३ लक्ष ९० हजार ५०० रुपये अनुदान जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले आहे. हे अनुदान तालुकास्तरावरील कार्यालयास वितरीतही करण्यात आले आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात हे अनुदान जमा करण्यासाठी तालुकास्तरावरुन कार्यवाही सुरु आहे. असे तहसिलदार (संगायो) यांनी कळविले आहे.