पातुर (सुनिल गाडगे) :- पातूर तालुक्यातील ग्राम आगिखेड येथे भव्य रोग निदान आरोग्य शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद असंख्य रुग्णांनी घेतला. शिबीराचा लाभ साई हेल्थ केअर क्लिनीक न्यू खेतान नगर अकोला यांचे अंतर्गत मधुमेह, रक्तदाब, त्वचेचे आजार, मेंदु रोग, (फीट येणे, मायग्रेन) वात, सांधे दुखी, गुडघे दुखी, पोटाचे विकार, डायरीया थाँयराईड, किडणी आजार, दमा, निमोनिया,रक्त कमी, यकृताचा आजार, ताप विकार,सर्दि व ईतर ही आजारावर शिबीरा मध्ये अकोला येथील प्रसिध्द डाँक्टर डाँ. अविनाश म.अत्तरकार (M.B.B.S), डाँ. शुभम खांबलकर (M.B.B.S), डाँ. प्रसन्न तायडे (M.B.B.S), डाँ. श्रध्दा अत्तरकार (B.A.M.S), डाँ. अर्पिता अत्तरकार (B.A.M.S) यांनी दिवसभर असंख्य रुग्णाची तपासणी करुन रुग्णांना औषध व गोळ्यांचे वाटप केले. शिबीरा करीता ग्रामपंचायत, आगिखेड सरपंच सौ. पुनम विवेक उगले, उपसरपंच श्री.नितेश गुलाबराव हिवराळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक श्री. प्रकाश अवचार, श्री. मनोहर इंगळे, श्री. दौलत अवचार, श्री. विनायक अत्तरकार, श्री. विठ्ठल अत्तरकार हे उपस्थीत होते.
आरोग्य शिबीरा साठी आगिखेड येथील श्री.संजय मोहण अत्तरकार व ग्रामपंचायत संगणक परीचालक श्री.राहुल श्री. उगले यांनी मोलाचे सहकार्य केले.